आयएनएस गोमती या युद्धनौकेचे आज मुंबईच्या नेव्हल डॉकयार्ड येथे समारंभपूर्वक सूर्यास्ताच्यावेळी डिकमशनिंग करण्यात आले. यावेळी व्हाइस अडमिरल अजेंद्र बहादूर सिंह सोबत नौदल अधिकारी उपस्थित होते. आयएनएस गोमती ही P-16 वर्गाची गोदावरी श्रेणीची तिसरी युद्धनौका आहे.
2/6
ही युद्धनौका 16 एप्रिल 1988 साली मुंबईच्या माझगाव डॉकयार्ड येथे कमिशनिंग होऊन भारतीय नौदलात दाखल झाली होती. 34 वर्षे गौरवशाली सेवा पूर्ण केल्यानंतर आज ही युद्ध नौका सेवामुक्त झाली.
3/6
या युद्धनौकेने ऑपरेशन कॅक्टस, पराक्रम आणि इंद्रधनुष्य आणि अनेक द्विपक्षीय आणि बहुराष्ट्रीय नौदल सरावांमध्ये भाग घेतला आहे.
4/6
आयएनएस गोमती ही त्या काळातील सर्वात आधुनिक तंत्रज्ञान असलेली युद्धनौका म्हणून तिची ओळख होती. सेन्सर आणि शस्त्राचा एकत्रित वापर या युद्धनौकेमध्ये केला गेला होता. शिवाय दोन हेलिकॉप्टर एका वेळेस लँड होतील किंवा वाहून नेले जातील अशा प्रकारची तिच्या आकाराची पहिली फ्रिगेट होती
5/6
राष्ट्रीय सागरी सुरक्षेतील तिच्या उल्लेखनीय कामगिरी आणि उत्कृष्ट योगदानासाठी या युद्धनौकेला अनेक पुरस्कार आणि सन्मान मिळाले आहेत.
6/6
आयएनएस गोमती सेवा मुक्त झाल्यानंतर या युद्धनौकेचा वारसा लखनौमधील गोमती नदीच्या नयनरम्य किनार्यावर उभारल्या जाणार्या खुल्या संग्रहालयात जिवंत ठेवला जाईल. तसेच या युद्धनौकेच्या अनेक लढाऊ यंत्रणा लष्करी आणि युद्ध अवशेष म्हणून प्रदर्शित केल्या जातील.