एक्स्प्लोर
जेवण उरकलं अन् झोपी गेलो, अचानक ट्रेनचा डब्बाच पलटला; नॉर्थ ईस्ट एक्सप्रेसमधील प्रवाशानं सांगितला अपघाताचा थरारक अनुभव
North East Express Derails: बिहार बक्सरमधील अपघाताचं भीषण चित्र समोर आले आहे. ही घटना सकाळी 9.35 च्या सुमारास घडली. अपघातातील गंभीर जखमींना पाटणा येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे.
![North East Express Derails: बिहार बक्सरमधील अपघाताचं भीषण चित्र समोर आले आहे. ही घटना सकाळी 9.35 च्या सुमारास घडली. अपघातातील गंभीर जखमींना पाटणा येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/10/12/d5c1a492f69f4f6561783f44e07710ca169707329495388_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
Bihar North East Express Train Derail
1/9
![आनंद विहार येथून धावणारी ट्रेन क्रमांक 12506 डाउन ईशान्य एक्स्प्रेस बिहारमधील बक्सर आणि आराह स्थानकांदरम्यान रघुनाथपूर स्थानकाजवळ रुळावरून घसरली. अपघातात रेल्वेचे अनेक डबे रुळावरुन घसरले आहेत.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/10/12/a46bced4fd6605baaf2b2e8148cbe365910b7.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
आनंद विहार येथून धावणारी ट्रेन क्रमांक 12506 डाउन ईशान्य एक्स्प्रेस बिहारमधील बक्सर आणि आराह स्थानकांदरम्यान रघुनाथपूर स्थानकाजवळ रुळावरून घसरली. अपघातात रेल्वेचे अनेक डबे रुळावरुन घसरले आहेत.
2/9
![वृत्त लिहिपर्यंत या अपघातात चार जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे. तसेच, अपघातातील मृतांचा आकडा आणखी वाढू शकतो, असंही प्रशासनाकडून सांगितलं जात आहे. बक्सरचे डीएम अंशुल अग्रवाल यांनी सांगितलं की, 80 ते 100 लोक अपघातात जखमी झाले आहेत. काहींना पाटणा येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. या अपघाताचं भीषण चित्र समोर आले आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/10/12/f78161384ec2455aa10760fdbe4fc3ad8d1cd.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
वृत्त लिहिपर्यंत या अपघातात चार जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे. तसेच, अपघातातील मृतांचा आकडा आणखी वाढू शकतो, असंही प्रशासनाकडून सांगितलं जात आहे. बक्सरचे डीएम अंशुल अग्रवाल यांनी सांगितलं की, 80 ते 100 लोक अपघातात जखमी झाले आहेत. काहींना पाटणा येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. या अपघाताचं भीषण चित्र समोर आले आहे.
3/9
![ट्रेनमधून प्रवास करणार्या काही प्रवाशांनी त्यांची आपबिती सांगितली. मोहम्मद नासिर नावाच्या प्रवाशानं सांगितलं की, आम्ही दोघेजण होतो. B7 बोगीत होतो. आम्ही जेवून झोपलेलो. काही कळण्यापूर्वीच अपघात घडला. सगळं क्षणार्धात घडलं. काहीच कळालं नाही.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/10/12/297524db07b3cf2a2c660dcdbe13fd5629bf7.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
ट्रेनमधून प्रवास करणार्या काही प्रवाशांनी त्यांची आपबिती सांगितली. मोहम्मद नासिर नावाच्या प्रवाशानं सांगितलं की, आम्ही दोघेजण होतो. B7 बोगीत होतो. आम्ही जेवून झोपलेलो. काही कळण्यापूर्वीच अपघात घडला. सगळं क्षणार्धात घडलं. काहीच कळालं नाही.
4/9
![ट्रेनमधून प्रवास करणारे मोहम्मद नसीर म्हणाले की, बोगीमध्ये किती लोक होते? हे सांगणं कठीण आहे. रेल्वेच्या डब्ब्यातून अनेक प्रवासी प्रवास करत होते. माझ्यासोबत माझे सहप्रवासी असलेल्या अबू जैद यांचा अपघातात मृत्यू झाला आहे. आम्ही आनंद विहारहून येत होतो. किशनगंजला जायचं होतं. आम्ही दोन मृतदेह पाहिलेत. अबू झैद 23-24 वर्षांचा असतील.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/10/12/a2f11a334088b557e08008609a79e659a3419.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
ट्रेनमधून प्रवास करणारे मोहम्मद नसीर म्हणाले की, बोगीमध्ये किती लोक होते? हे सांगणं कठीण आहे. रेल्वेच्या डब्ब्यातून अनेक प्रवासी प्रवास करत होते. माझ्यासोबत माझे सहप्रवासी असलेल्या अबू जैद यांचा अपघातात मृत्यू झाला आहे. आम्ही आनंद विहारहून येत होतो. किशनगंजला जायचं होतं. आम्ही दोन मृतदेह पाहिलेत. अबू झैद 23-24 वर्षांचा असतील.
5/9
![बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव अपघाताबाबत म्हणाले की,](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/10/12/5d00428adb3a0d66f38d3cea21b5c71122f37.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव अपघाताबाबत म्हणाले की, "मी सर्व अधिकारी, आरोग्य विभाग, आपत्ती विभागाच्या अधिकाऱ्यांशी बोललो आहे. बक्सर, आराह, पाटणा येथील रुग्णालयांना अलर्ट जारी करण्यात आला आहे. सुरक्षा दल, एनडीआरएफ, एसडीआरएफही घटनास्थळी दाखल झाले आहेत. अपघातग्रस्तांना वाचवणं आणि त्यांना तात्काळ मदत करणं यालाच प्राधान्य देण्यात येणार आहे. त्यासाठी एक हेल्पलाईन क्रमांकही जारी करण्यात आला आहे.
6/9
![दुसऱ्या एका प्रवाशानं सांगितलं की, त्याला कटिहारला जायचं आहे. प्रवासादरम्यान अचानक मोठा आवाज आला. दोन सेकंदात ट्रेन उलटली. मी एसी कोचमधून प्रवास करत होतो.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/10/12/2a8630e03067c851fb66690e82486e90a2cef.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
दुसऱ्या एका प्रवाशानं सांगितलं की, त्याला कटिहारला जायचं आहे. प्रवासादरम्यान अचानक मोठा आवाज आला. दोन सेकंदात ट्रेन उलटली. मी एसी कोचमधून प्रवास करत होतो.
7/9
![दुर्घटनेनंतर, बक्सर जिल्हा प्रशासनाची टीम तसेच, काही स्थानिकही घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी तात्काळ बचावकार्य सुरू केलं. तसेच, एनडीआरएफ आणि एसडीआरएफची टीमही घटनास्थळी पोहोचली आहे. बचावकार्य सुरू आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/10/12/93b9e701be6a2aa5e4029f37654d72584dbe7.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
दुर्घटनेनंतर, बक्सर जिल्हा प्रशासनाची टीम तसेच, काही स्थानिकही घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी तात्काळ बचावकार्य सुरू केलं. तसेच, एनडीआरएफ आणि एसडीआरएफची टीमही घटनास्थळी पोहोचली आहे. बचावकार्य सुरू आहे.
8/9
![या घटनेबाबत डुमरावचे आमदार अजितकुमार कुशवाह म्हणाले की, ही दुःखद घटना आहे. मोठ्या प्रमाणात रुग्णवाहिका पाचारण करण्यात आल्या आहेत. घटनास्थळी स्थानिकांची गर्दीही झाली आहे. आम्ही जास्तीत जास्त लोकांना वाचवण्याचा प्रयत्न करू.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/10/12/febbab83b47eef49988cf04971bda98c7e33d.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
या घटनेबाबत डुमरावचे आमदार अजितकुमार कुशवाह म्हणाले की, ही दुःखद घटना आहे. मोठ्या प्रमाणात रुग्णवाहिका पाचारण करण्यात आल्या आहेत. घटनास्थळी स्थानिकांची गर्दीही झाली आहे. आम्ही जास्तीत जास्त लोकांना वाचवण्याचा प्रयत्न करू.
9/9
![रेल्वे अपघातानंतर लोकांनी इकडे तिकडे आपल्या प्रियजनांचा शोध सुरू केला. अनेकांच्या नातेनाईकांचा आक्रोश पाहायला मिळत आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/10/12/c77700ded4b06f55abea8c708458683f79c43.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
रेल्वे अपघातानंतर लोकांनी इकडे तिकडे आपल्या प्रियजनांचा शोध सुरू केला. अनेकांच्या नातेनाईकांचा आक्रोश पाहायला मिळत आहे.
Published at : 12 Oct 2023 06:46 AM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
राजकारण
राजकारण
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)