एक्स्प्लोर
Amarnath Yatra 2023: अखेर तीन दिवसांनंतर अमरनाथ यात्रा पुन्हा सुरु, खराब वातावरणामुळे स्थगित करण्यात आली होती यात्रा
Amarnath Yatra 2023: अमरनाथ यात्रा 1 जुलै रोजी सुरू झाली होती. परंतु पाऊस आणि भूस्खलनामुळे यात्रेकरूंना पंजतरणी आणि शेषनाग बेस कॅम्पवर थांबवण्यात आले होते.
![Amarnath Yatra 2023: अमरनाथ यात्रा 1 जुलै रोजी सुरू झाली होती. परंतु पाऊस आणि भूस्खलनामुळे यात्रेकरूंना पंजतरणी आणि शेषनाग बेस कॅम्पवर थांबवण्यात आले होते.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/07/09/978cf4bbdee0e7979ad1f6b25e5a299b1688895956995539_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
Amarnath Yatra 2023
1/9
![पण आता तीन दिवसांनंतर म्हणजेच रविवार 9 जुलै रोजी अमरनाथ यात्रा पुन्हा सुरु करण्यात आली आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/07/09/88150cb981d55f32d5c7aa493a1ed2ff7e7d2.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
पण आता तीन दिवसांनंतर म्हणजेच रविवार 9 जुलै रोजी अमरनाथ यात्रा पुन्हा सुरु करण्यात आली आहे.
2/9
![वृत्तानुसार, अमरनाथ गुहेजवळ वातावरण चांगले झाल्याने अधिकाऱ्यांनी गुहेतील मंदिराचे दरवाजे उघडले आहेत.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/07/09/9fdc41090e07b7d4aec5ac3d0cdbad4247176.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
वृत्तानुसार, अमरनाथ गुहेजवळ वातावरण चांगले झाल्याने अधिकाऱ्यांनी गुहेतील मंदिराचे दरवाजे उघडले आहेत.
3/9
![ज्या यात्रेकरूंनी आधीच दर्शन घेतले आहे त्यांना बालटाल बेस कॅम्पवर परत जाण्याची परवानगी देण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/07/09/a8f342f9aed520f95b5cd8f9efa404c0dd78c.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
ज्या यात्रेकरूंनी आधीच दर्शन घेतले आहे त्यांना बालटाल बेस कॅम्पवर परत जाण्याची परवानगी देण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे.
4/9
![दरम्यान, खोऱ्यात मुसळधार पावसामुळे अडकलेल्या 700 हून अधिक अमरनाथ यात्रेकरूंना लष्कराने अनंतनाग जिल्ह्यातील काझीगुंड येथील छावणीत आश्रय दिला आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/07/09/6dbc816ccde3df37e0ee9bb7670eafeeb4035.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
दरम्यान, खोऱ्यात मुसळधार पावसामुळे अडकलेल्या 700 हून अधिक अमरनाथ यात्रेकरूंना लष्कराने अनंतनाग जिल्ह्यातील काझीगुंड येथील छावणीत आश्रय दिला आहे.
5/9
![सतत सुरु असलेल्या पावसामुळे जम्मू-श्रीनगर राष्ट्रीय महामार्ग विस्कळीत झाला आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/07/09/4e1d11e4f4bfb34ad7bb8205804e3b1b0b485.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
सतत सुरु असलेल्या पावसामुळे जम्मू-श्रीनगर राष्ट्रीय महामार्ग विस्कळीत झाला आहे.
6/9
![दक्षिण काश्मीर हिमालयातील 3,888 मीटर उंचीवर असलेल्या या मंदिराची 62 दिवसांची वार्षिक यात्रा 1 जुलै रोजी अनंतनाग जिल्ह्यातील पहलगाम आणि गंदरबल जिल्ह्यातील बालटाल येथून सुरू झाली आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/07/09/8a44624384a873fbbadcc5535eee57b5a8993.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
दक्षिण काश्मीर हिमालयातील 3,888 मीटर उंचीवर असलेल्या या मंदिराची 62 दिवसांची वार्षिक यात्रा 1 जुलै रोजी अनंतनाग जिल्ह्यातील पहलगाम आणि गंदरबल जिल्ह्यातील बालटाल येथून सुरू झाली आहे.
7/9
![ही यात्रा 31 ऑगस्ट रोजी समाप्त होणार आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/07/09/3157ff2f7e63e09a3082856bee331f2655f9e.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
ही यात्रा 31 ऑगस्ट रोजी समाप्त होणार आहे.
8/9
![यात्रा स्थगित केल्यामुळे अनेक यात्रेकरु अडकल्याची माहिती मिळत होती.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/07/09/2321d8446f9c8d82f66addd3f1c7bc1f8c7d1.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
यात्रा स्थगित केल्यामुळे अनेक यात्रेकरु अडकल्याची माहिती मिळत होती.
9/9
![पण आता यात्रा पुन्हा सुरु करण्यात आल्याने यात्रेकरुंना दिलासा मिळाल्याचं पाहायला मिळत आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/07/09/05007a46c7a5eb1271ce0fa6641d23051f4f2.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
पण आता यात्रा पुन्हा सुरु करण्यात आल्याने यात्रेकरुंना दिलासा मिळाल्याचं पाहायला मिळत आहे.
Published at : 09 Jul 2023 06:26 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
परभणी
राजकारण
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)