मुख्यपृष्ठफोटो गॅलरीहिंगोलीPhoto: पूल पाण्याखाली गेल्याने वृद्ध रुग्णाला कापडाच्या झोळीत बसवून काढला मार्ग; रस्त्यातच गेला जीव
Photo: पूल पाण्याखाली गेल्याने वृद्ध रुग्णाला कापडाच्या झोळीत बसवून काढला मार्ग; रस्त्यातच गेला जीव
By : माधव दिपके | Updated at : 19 Jul 2022 12:56 PM (IST)
Hingoli Rain
1/6
हिंगोलीच्या कळमनुरी तालुक्यातील पिंपरी खुर्द येथे एका वृद्ध व्यक्तीला रस्त्याअभावी वेळेवर उपचार न मिळाल्याने दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे.
2/6
गेल्या काही दिवसांपासून हिंगोली जिल्ह्यात सुरु असलेल्या जोरदार पावसामुळे नदी-नाल्यांना पूर आले आहे.
3/6
त्यामुळे अनेक गावांचा संपर्क तुटले आहे.
4/6
पिंपरी खुर्द येथील आजारी असलेले संभाजी माधवराव धांडे यांना रुग्णालयात नेण्यासाठी रस्ताच नव्हता.
5/6
पुलावरून पाणी वाहत असल्याने कापडाच्या झोळीत बसवून शेतातून काढावा लागला मार्ग
6/6
मात्र रुग्णालयात वेळेवर न पोहचल्याने संभाजी धांडे यांचा मृत्यू झाला.