एक्स्प्लोर

Gondia News: राज्यात गोंदियातील 'चांदसूरज' गावातून प्रवेश करतात सूर्यकिरणं

Maharashtra Gondia News: उगवत्या सूर्याची पहिली किरणं 'चांदसूरज' गावावर पडत असली तरी अद्याप या गावात पाहिजे तेवढी विकासाची किरणं पोहोचलेली नाहीच.

Maharashtra Gondia News

1/9
Maharashtra Gondia News: उगवत्या सूर्याची पहिली किरणं भारतात सर्वप्रथम अरुणाचल प्रदेशात पडतात. तशीच महाराष्ट्रात पहिली किरणं गोंदिया (Gondia News) जिल्ह्यातील अतिदुर्गम भागातील 'चांदसूरज' गावावर पडतात, असं 'चांदसूरज' (Chandsuraj) गावातील नागरिकांचं म्हणणं आहे.

2/9
महाराष्ट्राच्या (Maharashtra News) पूर्वेकडील छत्तीसगड राज्याच्या सीमेलगत डोंगराच्या मधोमध चांदसूरज हे टुमदार गाव वसलेलं आहे. राज्याच्या पूर्व टोकावर जिल्हा मुख्यालयापासून 70 किमीवर असलेल्या या गावापासून छत्तीसगडची (Chhattisgarh) सीमा प्रारंभ होते.

3/9
डोंगररांगा आणि वनराईनं नटलेल्या अतिदुर्गम सालेकसा तालुक्यातील चांदसूरज गाव म्हणजे, निसर्गरम्य परिसर. जवळच छत्तीसगडमधील डोंगरगड देवस्थान आहे. दोन्ही राज्यांची सीमा ओळखण्याकरता तिथे एक पुरातन शिला उभी केलेली आहे.

4/9
या शिलेवर चंद्र-सूर्याची आकृती कोरलेली आहे. यावरुनच या गावाला 'चांदसूरज' नाव पडलं असल्याचं मानलं जातं. या शिलेजवळच शीतलामाता देवस्थान असून या मंदिरात देखील चंद्र आणि सूर्याचं प्रतीक दर्शवणाऱ्या लोखंडी आकृतीची नागरिक पूजा करतात. तर सकाळचा सूर्य येथील नागरिकांसाठी देव असल्याचंही नागरिक भावूक होऊन सांगतात.

5/9
उगवत्या सूर्याची पहिली किरणं 'चांदसूरज' गावावर पडत असली तरी अद्याप या गावात पाहिजे तेवढी विकासाची किरणं पोहोचलेली नाहीत. तसं हे गाव गोंदिया जिल्ह्यातील अतिदुर्गम भागात आहे. येथे अनेक सोयीसुविधांचा अभाव आहे. या गावातील मुलांना शिक्षणासाठी पायपीट करावी लागते.

6/9
चौथीनंतर मुलांना शिक्षणासाठी लगतच्या विचारपूर येथं जावं लागतं, तर सातवीनंतर बदटोला आणि उच्च शिक्षणाकरता आमगाव, दर्रेकसा, सालेकसा येथे जाण्याशिवाय पर्यायच उरत नाही.

7/9
टोयागोंदी ग्रामपंचायतीअंतर्गत चांदसूरज हे गाव येतं. या गट ग्रामपंचायतीमध्ये विचारपूर, चांदसूरज, चौकीटोला, कोपालगड, टबरूटोला, बरटोला, दलाटोला या गावांचा समावेश आहे.

8/9
जवळपास 700 लोकवस्तीच्या या गावात दररोज सूर्यकिरणं येथील शिलेपासूनच महाराष्ट्रात प्रवेश करतात. त्यानंतरच महाराष्ट्र प्रकाशमय होतो, असं येथील नागरिकांचं म्हणणं आहे. गावात 92 घरं असून सुमारे 700 लोकवस्ती आहे. गावात धुरगोंडी आणि राजगोंडी भाषिक लोक राहतात. गावात जिल्हा परिषदेची प्राथमिक शाळा आहे. परंतु, मराठी भाषिक नगण्य असल्यामुळे जिल्हा परिषदेनं हिंदी पाठशाला सुरू केलेली आहे. शाळेत 20 विद्यार्थी आहेत.

9/9
तीन ते चार पिढ्या अगोदर चांदसूरज शिलेजवळ काही कारागीर लोक लोखंडी अवजारं बनवत असत. त्या काळात येथे टोकावर उभ्या एका शिलेवर चंद्र आणि सूर्याची प्रतिमा कोरलेली होती. सूर्याची प्रथम किरणं या शिलेवर पडत असल्यामुळे कदाचित गावाचं नावसुद्धा 'चांदसूरज' ठेवलं गेलं असावं, असं गावकरी सांगतात.

गोंदिया फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

निवडणुकीत जात-धर्म आणला जातो, सिल्लोडची पुढची विधानसभा लढणार नाही; अब्दुल सत्तारांची मोठी घोषणा

Makar Sankranti 2025 Wishes : मकर संक्रांतीच्या प्रियजनांना द्या 'या' खास शुभेच्छा; वाढवा सणाचा गोडवा, पाठवा 'हे' हटके शुभेच्छा संदेश
मकर संक्रांतीच्या प्रियजनांना द्या 'या' खास शुभेच्छा; वाढवा सणाचा गोडवा, पाठवा 'हे' हटके शुभेच्छा संदेश
मोठी बातमी ! UGC-NET ची 15 जानेवारीला होणारी परीक्षा रद्द; लवकरच जाहीर होईल नवी तारीख

सीमा लढ्यातील ज्येष्ठ सत्याग्रही, साहित्यिक व पत्रकार कॉम्रेड कृष्णा मेणसे यांचे निधन
सीमा लढ्यातील ज्येष्ठ सत्याग्रही, साहित्यिक व पत्रकार कॉम्रेड कृष्णा मेणसे यांचे निधन
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 10 PM TOP Headlines 10 PM 13 January 2025Sanjay  Raut Meet Sharad Pawar | मिशन पालिका इलेक्शन! संजय राऊतांनी घेतली शरद पवारांची भेटCity Sixty | सिटी 60 बातम्यांचा वेगवान आढावा एका क्लिकवर सुपरफास्ट ABP MajhaSantosh Deshmukh Case | धनंजय देशमुखांचं 'शोले' स्टाईल आंदोलन, सरकारला अल्टिमेटम Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
निवडणुकीत जात-धर्म आणला जातो, सिल्लोडची पुढची विधानसभा लढणार नाही; अब्दुल सत्तारांची मोठी घोषणा
निवडणुकीत जात-धर्म आणला जातो, सिल्लोडची पुढची विधानसभा लढणार नाही; अब्दुल सत्तारांची मोठी घोषणा
Makar Sankranti 2025 Wishes : मकर संक्रांतीच्या प्रियजनांना द्या 'या' खास शुभेच्छा; वाढवा सणाचा गोडवा, पाठवा 'हे' हटके शुभेच्छा संदेश
मकर संक्रांतीच्या प्रियजनांना द्या 'या' खास शुभेच्छा; वाढवा सणाचा गोडवा, पाठवा 'हे' हटके शुभेच्छा संदेश
मोठी बातमी ! UGC-NET ची 15 जानेवारीला होणारी परीक्षा रद्द; लवकरच जाहीर होईल नवी तारीख
मोठी बातमी ! UGC-NET ची 15 जानेवारीला होणारी परीक्षा रद्द; लवकरच जाहीर होईल नवी तारीख
सीमा लढ्यातील ज्येष्ठ सत्याग्रही, साहित्यिक व पत्रकार कॉम्रेड कृष्णा मेणसे यांचे निधन
सीमा लढ्यातील ज्येष्ठ सत्याग्रही, साहित्यिक व पत्रकार कॉम्रेड कृष्णा मेणसे यांचे निधन
मंत्रालयातील ती काळी लम्बोर्गिनी कोणाची; रोहित पवारांनी नावासह कुंडलीच काढली, 700 कोटी, मुंडेंचाही संदर्भ

Education : शालेय शिक्षणामध्ये महाराष्ट्र पुन्हा नंबर 1 होणार; मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला विश्वास
शालेय शिक्षणामध्ये महाराष्ट्र पुन्हा नंबर 1 होणार; मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला विश्वास
नायलॉन मांजाने पतंग उडवाल तर तुमच्यावर येणार संक्रात; विक्रेत्यांसह पालक, मुलांवर थेट 'सदोष मनुष्यवधाच्या प्रयत्नाचा' गुन्हा
नायलॉन मांजाने पतंग उडवाल तर येणार संक्रात; विक्रेत्यांसह पालक, मुलांवर थेट 'सदोष मनुष्यवधाच्या प्रयत्नाचा' गुन्हा
OBC विद्यार्थ्यांसाठी पुण्यासह 5 शहरात उत्कृष्ठता केंद्र स्थापन होणार; मुख्यमंत्र्यांकडून महाज्योतीचा आढावा

Embed widget