एक्स्प्लोर
'या मेरे अल्लाह करम फरमाना', पावसासाठी मुस्लीम बांधवांची विशेष नमाज अदा; पाहा फोटो
Namaz : भरपावसाळ्यात पावसाने दीर्घकाळ दडी मारल्याने पिके सुकायला लागली आहेत, पाणीटंचाईचे ढग घोंगायला लागले असल्याने चिंताजनक वातावरण आहे.

Special prayer of Muslim people
1/9

यामुळे पैठणच्या आडूळ गावात मुस्लिम बांधवांनी जोरदार पाऊस पडावा यासाठी ईदगाह मैदानावर विशेष नमाज अदा करत अल्लाहकडे पावसासाठी साकडे घातले.
2/9

पावसाअभावी पिकांनी माना टाकल्या आहेत. पाण्याचे स्त्रोत आटत चालले आहेत. यंदा अद्यापही एकही जोरदार पाऊस न झाल्याने विहिरी, तलाव, बोअरवेल्सच्या पाणीपातळीत वाढ झालेली नाही.
3/9

पिकांना पाणी कसे द्यायचे ? हा तर प्रश्न आहेच शिवाय पाणीटंचाईचा आणि चाराटंचाईचा सामनाही नागरिकांना करावा एकुणच वातावरण चिंताजनक असल्याने मुस्लीम बांधवांनी विशेष नमाज अदा केली.
4/9

आडूळ येथील मुस्लिम बांधवांनी अल्लाहकडे पाऊस पडण्यासाठी विशेष नमाज अदा करत साकडे घातले.
5/9

आडूळ गावातील खुल्या मैदानात असलेल्या ईदगाहवर ही नमाज अदा करण्यात आली.
6/9

अल्लाह दयाळु आहे, तो पाऊस पाडून सर्वांना सुखी ठेवील म्हणत मुस्लीम बांधवांनी एकत्र येऊन नमाज अदा केली.
7/9

यावेळी आडूळ गावातील आणि परिसरात राहणाऱ्या अंदाजे 4 हजार मुस्लीम बांधवांनी एकत्र येऊन विशेष नमाज अदा केली.
8/9

तसेच रोजच्या नमाजमध्ये देखील अल्लाहाकडे पावससाठी प्रार्थना करण्याची सूचना यावेळू उपस्थित असलेल्या मुफ्ती यांच्याकडून देण्यात आल्या.
9/9

सोबतच औरंगाबाद शहरातील छावणी ईदगाह मैदानावर देखील पाऊस पडावा म्हणून विशेष नमाज अदा करण्यात आली.
Published at : 26 Aug 2023 09:42 AM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
महाराष्ट्र
राजकारण
परभणी
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज


परशराम पाटील, एबीपी माझा
Opinion