एक्स्प्लोर
Chhatrapati Sambhaji Nagar Crime: पावडर अन् केमिकलने भरलेले ड्रम, औषधांच्या स्क्रॅपचा ड्रग्जसाठी वापर, छत्रपती संभाजीनगर हादरलं
Crime News: छत्रपती संभाजीनगरच्या साजापूरमध्ये NDPS पथकाची मोठी कारवाई झाली आहे. या कारवाईत खळबळ उडवून देणारा मुद्देमाल सापडला आहे. ड्रग्ज तयार करायला औषधांच्या स्क्रॅपचा वापर.
Chhatrapati Sambhaji Nagar Crime
1/11

साजापूर येथे NDPS पथकाने मोठी कारवाई करत टॅबलेट तयार करण्यासाठी वापरण्यात येणारी संशयित रसायनांची पावडर जप्त केली आहे. या कारवाईत दोन गोडाऊन सील करण्यात आले असून, संबंधित रसायनांचा नेमका उपयोग काय होता, याचा तपास पोलीस करत आहेत.
2/11

छत्रपती संभाजीनगर हद्दीतील साजापूर गाव ते साजापूर चौफुली यादरम्यान 2 आयशर गाड्या स्क्रॅपचे बॅरल घेऊन जाणार असून, बॅरलच्या आत मध्ये ड्रग्स तयार करण्याकरिता रासायनिक पावडरची तस्करी केली जाणार आहे अशी माहिती पोलिसांना मिळाली होती.
3/11

त्यानुसार पोलीस पथकाने साजपूर चौफुली येथे सापळा लावून छापा कारवाई केली असता, दोन आयशर वाहनांमधून कचऱ्याच्या / स्क्रॅपच्या मालामधून चोरट्या पद्धतीने स्क्रॅप पिशव्या मध्ये अंमली पदार्थाची वाहतूक होत असल्याचे निष्पन्न झाले. नमुद ठिकाणी पोलिसांनी पंचनामा करून 2 आयशर मधुन अनुक्रमे 1 किलो 111 ग्राम आणि ४०१ ग्रॅम असा पावडरसदृश्य पांढरा रसायन जप्त करण्यात आलेला आहे.
4/11

सदरचा माल हा इसम बबन खान रा. साजापूर,MIDC वाळुंज याचे गोडाऊन मध्ये जात असल्याने, सदर गोडाऊन मध्ये पोलिस पथकाने छापा टाकला असता, तेथून 961 ग्रॅम पांढरा रंगाचे पावडर सदृश्य असे जप्त करण्यात आले .
5/11

सदर रसायनांची शासकीय ड्रग्स आयडेंटिफिकेशन किट द्वारे तपासणी केली असता, त्यामध्ये सदरचे रसायन हे अमली पदार्थ असल्याबाबत सकारात्मक चाचणी आली आहे.
6/11

नमुद कारवाई मध्ये एकूण 2 किलो 463 ग्रॅम MD किंमत अंदाजे 1,23 65,000/- जप्त करण्यात आले आहे. जप्त मुद्देमालाचे Sample तपासणीकरिता FSL येथे पाठवले आहे.
7/11

छत्रपती संभाजीनगरच्या साजापूरमध्ये NDPS पथकाची मोठी कारवाई झाली आहे. या कारवाईत खळबळ उडवून देणारा मुद्देमाल सापडला आहे. ड्रग्ज तयार करायला औषधांच्या स्क्रॅपचा वापर.
8/11

image 8
9/11

संभाजीनगर हादरलं! औषधांच्या स्क्रॅप ड्रग्जसाठी वापर; पावडर अन् केमिकलने भरलेले ड्रम सापडले.
10/11

या ट्रकमध्ये सापडलेल्या साठ्यामुळे ड्रग्ज रॅकेट कनेक्शन समोर येण्याची शक्यता आहे.
11/11

हा सगळा माल MIDC वाळुंज याचे गोडाऊनमध्ये जात होता. याप्रकरणी तपास सुरु आहे.
Published at : 24 Jun 2025 08:03 AM (IST)
View More
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
करमणूक
महाराष्ट्र
व्यापार-उद्योग
करमणूक


















