एक्स्प्लोर
Gaurai Festival : रांगोळीच्या माध्यमातून पांडुरंगाची हुबेहूब प्रतिमा; पाहा भन्नाट रांगोळी
Gaurai Festival: महालक्ष्मीचा सण महिलांसाठी जीव की प्राण असतो, त्यामुळे या सणाच्या तयारीसाठी कित्येक दिवस आधीपासून महिला तयारी करत असतात.
image of Pandurang through Rangoli
1/10

छत्रपती संभाजीनगर शहरातील एन-1 भागातील अर्चना शिंदे यांच्या घरात देखील महालक्ष्मी बसल्या असून, त्यांनी महालक्ष्मीसमोर रांगोळीच्या माध्यमातून पांडुरंगाची प्रतिमा बनवली आहे.
2/10

अर्चना शिंदे यांनी पंढरीच्या पांडुरंगांची हुबेहूब प्रतिमा साखारली आहे.
3/10

विशेष म्हणजे रांगोळीच्या माध्यमातून पांडुरंगाची प्रतिमा तयार करतांनी त्यांनी अनेक कडधान्य देखील वापरले आहेत.
4/10

पंढरपूर येथील मंदिरात असणाऱ्या खांबासारखेच हुबेहूब खांब अर्चना शिंदे यांनी रांगोळीच्या माध्यमातून बनवले आहेत.
5/10

सोबतच रांगोळीच्या माध्यमातून तयार करणाऱ्या आलेल्या प्रतिमेत विठ्ठलाचे सावळे रूप देखील यावे म्हणून, विशेष प्रयत्न करण्यात आले आहे.
6/10

यासाठी शिंदे यांनी वेगेवेगळ्या रंगाचा वापर केल्याचे देखील पाहायला मिळाले आहेत.
7/10

महालक्ष्मीसमोर रांगोळीच्या माध्यमातून पांडुरंगाची प्रतिमा तयार करण्यासाठी अर्चना शिंदे यांना तब्बल 32 तासांचा कालावधी लागला आहे.
8/10

रांगोळीच्या माध्यमातून पांडुरंगाची प्रतिमा तयार करण्यासाठी अर्चना शिंदे यांनी अनके कडधान्य वापरले असून, ज्यात जवस, सुपारी, प्रत्यक प्रकारची डाळ, साबुदाणा, गुंजाच्या बिया, भोपळ्याचे बिया, नाचणी, मटकीसह भरपूर पदार्थांचा वापर करण्यात आला आहे.
9/10

विशेष म्हणजे विठ्ठ्ल्याच्या गळ्यातील हार तयार करण्यासाठी पिस्ताच्या वरील कव्हर वापरण्यात आले आहे.
10/10

यापूर्वी देखील अर्चना शिंदे यांनी रांगोळ्याच्या माध्यमातून वेगवेगळे प्रयोग केले आहेत. तर खी वर्षांपूर्वी त्यांनी हुबेहूब पैठणी साडी तयार केली होती.
Published at : 23 Sep 2023 07:01 PM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
क्राईम
छत्रपती संभाजी नगर
राजकारण























