एक्स्प्लोर
Aurangabad News: पैठणचा गोदाकाठ 11 हजार दिव्यांनी उजळला; गोदावरी प्रकट दिनानिमित्त दीपोत्सव साजरा
संत एकनाथ महाराज समाधी मंदिराच्या पाठीमागील गोदावरीच्या नाथ घाटावर 11 हजार दिवे प्रज्वलित करून दीपोत्सव साजरा करण्यात आला.

Aurangabad News | Paithan Godakath
1/10

गोदावरी प्रकट दिनाच्या मुहूर्तावर आज पैठणचा गोदाकाठ दिव्यांनी उजळला आहे.
2/10

संत एकनाथ महाराज समाधी मंदिराच्या पाठीमागील गोदावरीच्या नाथ घाटावर 11 हजार दिवे प्रज्वलित करून दीपोत्सव साजरा करण्यात आला.
3/10

हा नयनरम्य सोहळा आपल्या डोळ्यात साठविण्यासाठी भाविकांनी नाथमंदिर परिसरात गर्दी केली होती.
4/10

याप्रसंगी हरी भक्त परायण ज्ञानेश्वर महाराज कोल्हापूरकर, पोलिस निरिक्षक किशोर पवार यांच्या हस्ते गोदावरीची पूजा करण्यात आली.
5/10

आपल्या संस्कृतीत नदीला माता, आई मानतो. त्यामुळे नदीला आपण माँ गंगा,गोदमाई, माता गोदावरी संबोधतो.
6/10

नदी संवर्धनाचा संदेश देत गोदावरी नदी जन्मोसव साजरा करण्यात आला आहे.
7/10

नदी संवर्धन आणि संरक्षणाचा संदेश देत गोदावरी नदी अवतरण दिनानिमित्त गोदा आरती करण्यात आली आहे.
8/10

यावेळी गोदावरी नदी पात्राशेजारी दिवे आणि पणत्या पेटवून, हजारो नागरिकांच्या उपस्थितीत गोदावरी नदी अवतरण सोहळा, महाआरती करून संपन्न झालाय.
9/10

विकासार्थ विद्यार्थी आणि अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
10/10

गोदावरी नदी संवर्धन आणि संरक्षणासाठी गोदावरी अवतरण दिन साजरा करण्यात आला.
Published at : 01 Feb 2023 08:47 AM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
ठाणे
राजकारण
नागपूर
नाशिक
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
