एक्स्प्लोर
Mahashivratri 2023 : शिर्डीत भक्तांसाठी महाशिवरात्रीनिमित्त साडे पाच टन साबुदाणा खिचडीचा महाप्रसाद
Mahashivratri 2023 : आज महाशिवरात्रीनिमित्त शिर्डीच्या साईप्रसादालयात तब्बल साडेपाच हजार किलो साबुदाणा वापरून साबुदाणा खिचडी तयार करण्यात आली.
Mahashivratri 2023
1/8

आज राज्यभरात महाशिवरात्रीचा उत्साह मोठ्या प्रमाणात साजरा केला जातोय. ठिकठिकाणी भगवान शंकराच्या दर्शनासाठी भक्तांची गर्दी पाहायला मिळतेय.
2/8

महाशिवरात्रीनिमित्त साईबाबांच्या शिर्डीत येणाऱ्या साई भक्तांसाठी साबुदाणा खिचडी आणि झिरक याचा महाप्रसाद ठेवण्यात आला.
3/8

आज महाशिवरात्रीनिमित्त शिर्डीच्या साईप्रसादालयात तब्बल साडेपाच हजार किलो साबुदाणा वापरून साबुदाणा खिचडी तयार करण्यात आली.
4/8

आषाढी एकादशी आणि महाशिवरात्र या दोन दिवशी साईप्रसादालयात साबुदाणा खिचडीचा प्रसाद देण्यात येत असतो.
5/8

आज खिचडी सोबतच शेंगदाणा झिरक सुद्धा भक्तांना प्रसाद म्हणून देण्यात आलं.
6/8

महाशिवरात्र निमित्त येणाऱ्या साईभक्तांना असणारा उपवास लक्षात घेता साई संस्थानकडूनही जय्यत तयारी करण्यात आली.
7/8

आज दिवसभरात जवळपास 50 ते 60 हजार भाविक साईप्रसादाला येतील अशी शक्यता गृहीत धरून साई प्रसादालयात हा साडेपाच हजार किलोचा साबुदाणा वापरून खिचडी तयार करण्यात आली आहे.
8/8

साईबाबांच्या समाधीवरसुद्धा याच खिचडीचा प्रसाद दाखवण्यात येतो.
Published at : 18 Feb 2023 09:00 PM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
राजकारण
धाराशिव
महाराष्ट्र























