एक्स्प्लोर
संगमनेर ब्रिटीशांच्या काळापासून सुरु आहे आगळी वेगळी... जाणून घ्या!
Hanuman Jayanti 2023 अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर साजऱ्या होणाऱ्या हनुमान जन्मोत्सवाला आगळं वेगळ महत्व आहे. या ठिकाणी निघणाऱ्या रथ यात्रेत बजरंगबलीचा रथ ओढण्याचा मान महिलांना मिळतो.
Hanuman Jayanti 2023
1/10

पोलिसांनी महिलांबरोबक अनेक युक्तिवाद केले, भीती दाखवली, अटक करण्याची- खटले भरण्याची धमकीही दिली.
2/10

ब्रिटीशांनी बंदी घातलेल्या रथाला बंदी झुगारून शेकडो महिलांनी 1929 साली रथ यात्रा काढली होती.
3/10

तेव्हापासून ही परंपरा आजही सुरु आहे.
4/10

या रथयात्रेदरम्यान पोलिसांना विशेष मान असून पोलिसांनी वाजत गाजत आणलेला झेंडा रथावर लावल्यावरच रथ ओढला जातो.
5/10

अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर साजऱ्या होणाऱ्या हनुमान जन्मोत्सवाला आगळं वेगळ महत्व आहे.
6/10

या ठिकाणी निघणाऱ्या रथ यात्रेत बजरंगबलीचा रथ ओढण्याचा मान महिलांना असून हा मान मिळवण्यासाठी शेकडो महिला दरवर्षी या ठिकाणी गर्दी करतात.
7/10

महिलांना या ठिकाणी मिळणाऱ्या या मानाला ब्रिटीशकालीन इतिहास असून ब्रिटीशांनी या रथ यात्रेवर बंदी घालून अनेक तरुणांना ताब्यात घेतले होते. 23 एप्रिल 1929 रोजी हनुमान जयंतीच्या पहाटे मंदिराभोवती पोलिसांचा गराडा पडला.
8/10

पोलीस आपल्या सरकारी ताकदीच्या जोरावर मिरवणुकीस करत असलेला विरोध पाहता नेते मंडळी घरी गेली. एवढ्यात अचानक 200 ते 250 महिलांनी एकत्र येत रथ ताब्यात घेतला.
9/10

सरकारी ताकदीचा रुबाब दाखवला पण या आदिशक्तीस्वरुप भारतीय नारींनी आपला उत्सव पार पाडण्याचा निर्धार कायम ठेवला.
10/10

या गडबडीचा फायदा घेत झुंबरबाई अवसक, बंकाबाई परदेशी, लीला पिंगळे आणि इतर मुली, महिलांनी रथावर चढून हनुमान प्रतिमा ठेऊन "बलभीम हनुमान की जय"चा जयघोष केला.
Published at : 06 Apr 2023 03:36 PM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
राजकारण
धाराशिव
महाराष्ट्र























