एक्स्प्लोर
PHOTO : जगातील सर्वात लोकप्रिय सोशल मीडिया साईट आणि त्यांचा रंजक इतिहास
Feature_Photo_2
1/5

व्हॉट्सॲपची निर्मिती 2009 साली ब्रायन ॲक्टन आणि जॅन कोम या दोन अमेरिकन व्यक्तींनी केली. कॅलिफोर्नियाच्या माउंटन व्ह्यू या शहरामध्ये मुख्यालय असलेल्या व्हॉट्सॲपला 2014 साली फेसबुक कंपनीने विकत घेतले. जगातील सर्वाधिक वापरात असलेले समाज माध्यम म्हणून व्हॉट्सॲप ओळखला जातो. नवनवीन आणि आकर्षक फीचर्स देत युजर्सना टिकवून ठेवण्याचा प्रयत्न व्हॉट्सॲपकडून सातत्याने केला जातो. (photo courtesy : pixabay)
2/5

फेसबुक जगातील सर्वात लोकप्रिय सोशल मीडिया साईट म्हणून प्रचलित आहे. 2004 साली फेसबुकची स्थापना झाली. मार्क झुकरबर्ग यांनी डस्टिन मोस्कोविट्ज, एड्युअर्डो सार्विन आणि ख्रिस ह्युजेस या वर्गमित्रांसोबत हार्वर्ड विद्यापीठात असताना फेसबुकची स्थापना केली होती. फेसबुक हे संवाद साधण्याचं प्रभावी माध्यम आहे. (photo courtesy : pixabay)
Published at : 30 Jun 2021 10:32 AM (IST)
आणखी पाहा























