एक्स्प्लोर
Shrawan : आज उत्तर भारतातील श्रावणातील शेवटचा सोमवार, महादेवाच्या मंदिरात भाविकांची गर्दी
Mahadev Mandir : उत्तर भारतातील श्रावण महिन्यातील शेवटच्या सोमवारी देशभरातील महादेवाच्या मंदिरात भाविकांनी गर्दी केली.

Mahadev Mandir
1/9

श्रावण महिन्यात सोमवारच्या दिवशी महादेवाचं दर्शन घेणं हे पवित्र मानलं जातं.
2/9

उत्तर भारतात श्रावण महिन्याचा आजचा शेवटचा सोमवार आहे. त्यामुळे देशभरातील महादेवाच्या मंदिरात भाविकांनी मोठी गर्दी केली.
3/9

श्रावण महिन्यात महादेवाच्या दर्शनाला अनोखे महत्व असते. देश विदेशात महादेवाचे अनेक रूपांची शेकडो पुरातन मंदिरे असून त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात भाविक जातात.
4/9

श्रावण सोमवार निमित्त देशभरातील महत्त्वाच्या मंदिरात भाविकांची दर्शनासाठी मोठी गर्दी पाहायला मिळाली.
5/9

उत्तर भारतात शेवटचा श्रावण सोमवार असल्याने महादेवाचे दर्शन घेण्यासाठी देशभरातूनच नव्हे तर जगभरातून भाविक आल्याचं दिसून आलं.
6/9

मोठ्या प्रमाणात भाविक दर्शनाला येणार असल्याने होणारी गर्दी लक्षात घेता गैरसोय होऊ नये यासाठी मंदिर ट्रस्टच्या वतीने विशेष सुविधा उपलब्ध करण्यात आल्या होत्या.
7/9

मंदिर परिसरात पोलिसांनी सुरक्षेच्या चोख व्यवस्था ठेवल्या असून सर्व उपाययोजना करण्यात आल्याचं दिसून आलं.
8/9

त्यामध्ये सीसीटीव्ही कॅमेरे आणि पोलिसांचा देखील बंदोबस्त मंदिर परिसरामध्ये तैनात करण्यात आला आहे.
9/9

श्रावणी सोमवारनिमित्त अनेक मंदिरांत आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली आहे. गुलाब, कामिनी, झेंडू इत्यादी फुलांनी केलेल्या सजावटीमुळं विठ्ठलाच्या मंदिराला मोहक रुप लाभलंय.
Published at : 28 Aug 2023 08:32 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
कोल्हापूर
क्राईम
मुंबई
मुंबई
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
