एक्स्प्लोर
घरात नकारात्मक ऊर्जा आहे का? कसं ओळखाल; जाणून घ्या!
आपल्या घरात सकारात्मक आणि प्रसन्न वातावरण असणं खूप महत्त्वाचं आहे.
नकारात्मक ऊर्जा
1/10

पण अनेक वेळा आपल्याला नकळत नकारात्मक ऊर्जा जाणवू लागते
2/10

जी मन, शरीर आणि नात्यांवर वाईट परिणाम करू शकते. ही नकारात्मक ऊर्जा ओळखण्यासाठी काही स्पष्ट संकेत आणि लक्षणं आहेत.
3/10

सतत वाद-विवाद आणि तणाव : घरात लहानसहान गोष्टींवरूनही सतत भांडणं, गैरसमज किंवा त्रासदायक शांतता असेल, तर ती नकारात्मकतेची लक्षणं असू शकतात. अशा ठिकाणी माणसं अधिक चिडचिडीत आणि अस्वस्थ वाटतात.
4/10

झोप न लागणे किंवा विचित्र स्वप्नं: जर घरात झोप नीट लागत नसेल, किंवा सतत विचित्र/भीतीदायक स्वप्नं पडत असतील, तर त्या जागेची ऊर्जा असंतुलित असू शकते.
5/10

झाडं वाळणं आणि पाळीव प्राण्यांची अस्वस्थता: घरातील झाडं योग्य काळजी घेत असूनही सुकत असतील, किंवा पाळीव प्राणी एकाच कोपऱ्याला टाळत असतील – तर त्या जागेभोवती नकारात्मक ऊर्जा असण्याची शक्यता असते.
6/10

घरात गोष्टी वारंवार तुटणं किंवा बिघडणं: इलेक्ट्रॉनिक वस्तू वारंवार बिघडणं, दिवे फ्लिकर होणं किंवा काचेच्या वस्तू सहज तुटणं हे संकेतही दुर्लक्षित करू नयेत.
7/10

अकारण थकवा आणि निराशा वाटणं: घरात असताना सतत कंटाळा, थकवा किंवा नकारात्मक विचार येत असतील, तर वातावरणात काहीतरी असंतुलन आहे हे ओळखायला हवं.
8/10

नकारात्मक ऊर्जा दूर करण्यासाठी काही उपाय: दररोज घरात कापूर आणि लवंग जाळा
9/10

शंख किंवा घंटा वाजवा, मीठ पाण्यात टाकून पुसायला वापरा
10/10

घरात तुळस, मनी प्लांट लावा, दर शुक्रवारी झाडू किंवा जुन्या वस्तू घराबाहेर टाका (टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )
Published at : 30 Jul 2025 08:43 AM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
व्यापार-उद्योग
भारत
नागपूर























