एक्स्प्लोर
Symptoms of Dehydration : कोरडे ओठच नाही तर शरीरात दिसणारी ही लक्षणंही दर्शवतात पाण्याची कमतरता!
या लेखात आम्ही तुम्हाला शरीरातील पाण्याच्या कमतरतेच्या अशाच काही लक्षणांविषयी सांगणार आहोत, ज्याबद्दल जाणून तुम्हीही थक्क व्हाल !
शरीर निरोगी राहण्यासाठी पुरेशा प्रमाणात पाणी खूप आवश्यक आहे. उन्हाळ्यात शरीरातून घामही बाहेर पडतो आणि उष्णतेच्या लाटेमुळे उलट्या आणि अतिसाराची होऊ लागते. अशावेळी ओठ कोरडे पडणे किंवा फाटणे याव्यतिरिक्त आपले शरीर असे अनेक संकेत देते ज्यामुळे शरीरातील पाण्याची कमतरता ओळखता येते.(Photo Credit : pexels )
1/7

शरीराला आवश्यक ते पाणी मिळत नाही तेव्हा डिहायड्रेशनची समस्या निर्माण होते. अनेकदा लोक जास्त तहान लागण्याचा संबंध शरीरातील पाण्याच्या कमतरतेशीच जोडतात, पण आज आम्ही तुम्हाला शरीरातील पाण्याच्या कमतरतेच्या अशाच काही लक्षणांविषयी सांगणार आहोत, ज्याबद्दल जाणून तुम्हीही थक्क व्हाल.(Photo Credit : pexels )
2/7

सतत च्या जगण्यामुळे तुम्हालाही डोकेदुखी होत असेल तर हे देखील पाण्याच्या कमतरतेचे लक्षण असू शकते. डिहायड्रेशनमुळे मेंदूतील रक्त प्रवाह आणि ऑक्सिजन च्या पुरवठ्यावर परिणाम होतो .(Photo Credit : pexels )
3/7

डिहायड्रेशनच्या स्थितीत, लोक बऱ्याचदा भूक आणि तहान यांच्यातील फरकाबद्दल गोंधळतात आणि तहान ही अन्नाची लालसा मानतात आणि जास्त खाण्यास सुरवात करतात. अशा वेळी घसा अधिक कोरडा पडतो आणि अन्न पचवण्यासाठी शरीरात पुरेसे पाणी नसल्यास अपचन, बद्धकोष्ठता आणि अॅसिडिटी सारख्या समस्याही दिसून येतात.(Photo Credit : pexels )
4/7

तोंडातून दुर्गंधी येणे हेही पाण्याच्या कमतरतेचे लक्षण मानले जाते. कमी पाणी प्यायल्याने घशात कोरडेपणा तर येतोच, शिवाय तोंडात बॅक्टेरिया ही जास्त पसरतात.(Photo Credit : pexels )
5/7

पाण्याच्या कमतरतेमुळे आपल्या शरीरातील प्लाझ्माची संख्या देखील कमी होते, ज्यामुळे रक्त प्रवाह वेगवान होतो आणि हृदयाचे ठोके वाढतात. अशावेळी हे लक्षण ओळखताना पाण्याच्या प्रमाणात लक्ष द्यावे लागते, तसेच ही हृदयाशी निगडित बाब असल्याने डॉक्टरांचा सल्ला घेणे टाळू नका.(Photo Credit : pexels )
6/7

जेव्हा शरीरात पाण्याची कमतरता असते तेव्हा त्वचा कोरडी तर होतेच, शिवाय त्वचेवर बारीक रेषा आणि सुरकुत्याही दिसतात. हे लक्षण दर्शविते की आपण बऱ्याच काळापासून पाण्याच्या कमतरतेशी झगडत आहात.(Photo Credit : pexels )
7/7

टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.(Photo Credit : pexels )
Published at : 28 Mar 2024 12:13 PM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
























