एक्स्प्लोर
Benefits of Tadgola : पालघरमध्ये ताडगोळ्यांमुळे अनेकांना रोजगार, उन्हाळ्यात ताडगोळे खाण्याचे फायदे
![](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/04/20/e9b431047cf258b1b38be1daf9614440_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
Palghar Tadgola Benefits
1/10
![नैसर्गिक साधनसंपत्तीने नटलेल्या पालघरमध्ये पावसाळ्याप्रमाणे वसंत ऋतूमध्येही मोठ्या प्रमाणावर रानमेवा उपलब्ध असतो. जंगलातील कैर्या, करवंद, काळं जांभूळ, धामण, तोरण यांच्याप्रमाणेच इथल्या नागरिकांना आणि इथे येणाऱ्या पर्यटकांना मोहून टाकणारा रानमेवा म्हणजे ताडाचे ताडगोळे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/04/20/efa21c265fa85679b779b6cef7e055a863860.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
नैसर्गिक साधनसंपत्तीने नटलेल्या पालघरमध्ये पावसाळ्याप्रमाणे वसंत ऋतूमध्येही मोठ्या प्रमाणावर रानमेवा उपलब्ध असतो. जंगलातील कैर्या, करवंद, काळं जांभूळ, धामण, तोरण यांच्याप्रमाणेच इथल्या नागरिकांना आणि इथे येणाऱ्या पर्यटकांना मोहून टाकणारा रानमेवा म्हणजे ताडाचे ताडगोळे.
2/10
![पालघर जिल्ह्यातील ग्रामीण भागात असलेला या ताडगोळ्यापासून अनेक शेतकऱ्यांना चांगले उत्पन्नही मिळत आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/04/20/8b078c4916d91a186be6b73b8ccbfc9eb63f5.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
पालघर जिल्ह्यातील ग्रामीण भागात असलेला या ताडगोळ्यापासून अनेक शेतकऱ्यांना चांगले उत्पन्नही मिळत आहे.
3/10
![तसंच ताडगोळ्याचे अनेक फायदे असल्याने पर्यटक आणि नागरिकही याकडे आकर्षित होत आहेत.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/04/20/b62b5fc9d47933ebd7b3a31b16502bb0be7e1.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
तसंच ताडगोळ्याचे अनेक फायदे असल्याने पर्यटक आणि नागरिकही याकडे आकर्षित होत आहेत.
4/10
![पालघर जिल्ह्यात विशेषतः ग्रामीण भागात मिळणाऱ्या ताडाच्या झाडाच्या ताड गोळ्यांना सध्या मोठ्या प्रमाणात मागणी आहे. लिचीप्रमाणे पारदर्शक असलेला हा पदार्थ शरीरासाठी अत्यंत गुणकारी आणि चवदार असल्याने ताडगोळ्यांना मोठी मागणी आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/04/20/e4bcacfb1116309fcafb5d792ec80d6c7ed3b.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
पालघर जिल्ह्यात विशेषतः ग्रामीण भागात मिळणाऱ्या ताडाच्या झाडाच्या ताड गोळ्यांना सध्या मोठ्या प्रमाणात मागणी आहे. लिचीप्रमाणे पारदर्शक असलेला हा पदार्थ शरीरासाठी अत्यंत गुणकारी आणि चवदार असल्याने ताडगोळ्यांना मोठी मागणी आहे.
5/10
![शेतकऱ्यांच्या शेताच्या बांधावर असलेल्या अनेक ताडाच्या झाडांना वसंत ऋतूमध्ये ताडगोळे येतात. या ताडगोळ्यांची विक्री करुन येथील अनेक कुटुंब आपला उदरनिर्वाह करतात.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/04/20/6c5822594430bc411e049ecb70224782eb843.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
शेतकऱ्यांच्या शेताच्या बांधावर असलेल्या अनेक ताडाच्या झाडांना वसंत ऋतूमध्ये ताडगोळे येतात. या ताडगोळ्यांची विक्री करुन येथील अनेक कुटुंब आपला उदरनिर्वाह करतात.
6/10
![त्यामुळे ताडाच्या झाडाची लागवड आणि ताडगोळ्यांची विक्री हा सध्या शेतीला पूरक आणि पर्यायी व्यवसाय बनला आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/04/20/62ff63f2c5cf24f884d44cab6669b3a4f5887.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
त्यामुळे ताडाच्या झाडाची लागवड आणि ताडगोळ्यांची विक्री हा सध्या शेतीला पूरक आणि पर्यायी व्यवसाय बनला आहे.
7/10
![पालघर मधील ताडगोळे हे विक्रीसाठी मुंबई ठाण्यासह अनेक मोठ्या शहरांमध्ये तसेच उन्हाळ्यात भरणाऱ्या यात्रांमध्ये जातात. या ताडगोळ्यामुळे अनेकांना रोजगारही उपलब्ध झाला आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/04/20/7fed7af1da1d4f32b11a8ca8cdeb2aab79275.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
पालघर मधील ताडगोळे हे विक्रीसाठी मुंबई ठाण्यासह अनेक मोठ्या शहरांमध्ये तसेच उन्हाळ्यात भरणाऱ्या यात्रांमध्ये जातात. या ताडगोळ्यामुळे अनेकांना रोजगारही उपलब्ध झाला आहे.
8/10
![ताडगोळे चवदार आणि शरीरासाठी अत्यंत गुणकारी असे समजले जातात. निसर्गतः थंड असलेल्या या ताडगोळ्यामुळे शरीरातील उष्णता नियंत्रित राहण्यास मदत होते. तसंच यात मोठ्या प्रमाणावर पोषकतत्व आणि पाणी असून ताडगोळ्यांच्या सेवनामुळे इम्युनिटी सिस्टिम मजबूत होण्यास मदत होते.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/04/20/c4eaa0f8d3a2025dc50f6ea715d01a390f9e6.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
ताडगोळे चवदार आणि शरीरासाठी अत्यंत गुणकारी असे समजले जातात. निसर्गतः थंड असलेल्या या ताडगोळ्यामुळे शरीरातील उष्णता नियंत्रित राहण्यास मदत होते. तसंच यात मोठ्या प्रमाणावर पोषकतत्व आणि पाणी असून ताडगोळ्यांच्या सेवनामुळे इम्युनिटी सिस्टिम मजबूत होण्यास मदत होते.
9/10
![ताडगोळ्यांमध्ये खनिज, लोह, पोटॅशिअम, फॉस्फरस आणि व्हिटॅमिन ए, बी, सी हे जीवनसत्त्व आढळतात. त्यामुळे एकंदरीतच हे फळ शरीरासाठी खूप उपयुक्त ठरतं. त्यामुळे आरोग्यासाठी गुणकारक असल्याने या ताडगोळ्यांना आता मागणी वाढू लागली आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/04/20/fa9c3c8301a70fcd8eec5e23099b3c4f56322.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
ताडगोळ्यांमध्ये खनिज, लोह, पोटॅशिअम, फॉस्फरस आणि व्हिटॅमिन ए, बी, सी हे जीवनसत्त्व आढळतात. त्यामुळे एकंदरीतच हे फळ शरीरासाठी खूप उपयुक्त ठरतं. त्यामुळे आरोग्यासाठी गुणकारक असल्याने या ताडगोळ्यांना आता मागणी वाढू लागली आहे.
10/10
![ताडाची झाडे ही विशेषत: कोकण, गोवा दक्षिण भारतातील राज्यांमध्ये आढळून येतात. मात्र मुंबई, ठाण्यासारखी महानगरं जवळ असल्याने इथे पालघरमधून मोठ्या प्रमाणावर ताडगोळ्याची आयात होते.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/04/20/c83c78c8fc3b9c57c2c4357f85a0e4c4cec5b.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
ताडाची झाडे ही विशेषत: कोकण, गोवा दक्षिण भारतातील राज्यांमध्ये आढळून येतात. मात्र मुंबई, ठाण्यासारखी महानगरं जवळ असल्याने इथे पालघरमधून मोठ्या प्रमाणावर ताडगोळ्याची आयात होते.
Published at : 20 Apr 2022 12:48 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
सातारा
महाराष्ट्र
क्रीडा
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)