एक्स्प्लोर
Cancer: कॅन्सरवर मात करायला मदत करतात 'हे' पदार्थ! जाणून घ्या...
Cancer:मेडिकल सायन्सने गेल्या काही वर्षांत खूप प्रगती केली आहे, पण कर्करोग हा अजूनही सर्वात धोकादायक आजारांपैकी एक आहे.जर त्यावर सुरुवातीच्या टप्प्यात उपचार केले तर तो नियंत्रणात येऊ शकतो.
Cancer
1/7

ब्लूबेरी, ब्लॅकबेरी आणि रास्पबेरी सारख्या फ्रोझन बेरीजमध्ये अँथोसायनिन्स एलाजिक ऍसिड आणि फ्लेव्होनॉइड्स सारखे अँटिऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात असतात. हे घटक डीएनएला फ्री रॅडिकल्समुळे होणाऱ्या नुकसानापासून संरक्षण करतात.
2/7

किवीमध्ये व्हिटॅमिन सी फायबर कॅरोटीनॉइड्स आणि पॉलीफेनॉलसारखे अँटिऑक्सिडंट्स असतात जे पेशींना नुकसानापासून वाचवतात.
3/7

एडामामे म्हणजे कच्चे सोयाबीन यात आयसोफ्लाव्होन नावाचे प्लांट बेस्ड कंपाऊंड असतात हे कंपाऊंड शरीरातील इस्ट्रोजेन रिसेप्टर्सवर परिणाम करतात आणि ब्रेस्ट तसेच प्रोस्टेट कर्करोगाचा धोका कमी करण्यास मदत करतात.
4/7

बीन्स हे फायबर प्लांट प्रोटीन आणि अँटिऑक्सिडंट्सचे उत्तम स्त्रोत आहेत. फायबर पचनक्रियेला मदत करतं आणि शरीरातील विषारी पदार्थ बाहेर काढतं त्यामुळे कर्करोगाचा धोका कमी होतो.
5/7

ब्रोकोली फुलकोबी आणि ब्रुसेल्स स्प्राउट्स सारख्या भाज्यांमध्ये ग्लुकोसिनोलेट्स भरपूर प्रमाणात असतात हे घटक शरीरात आयसोथियोसायनेट्स आणि इंडोल्समध्ये बदलतात हे तत्व लिव्हरमधील एन्झाइम्स सक्रिय करून शरीरातून कर्करोग निर्माण करणारे पदार्थ बाहेर टाकतात.
6/7

रताळ्याचा जांभळा रंग अँथोसायनिन्सपासून येतो हे शक्तिशाली अँटिऑक्सिडंट्स कॅन्सरमुळे होणाऱ्या पेशींचे नुकसान कमी करतात तसेच कर्करोगाच्या पेशींची वाढ थांबवतात.
7/7

(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )
Published at : 01 Nov 2025 02:08 PM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
























