एक्स्प्लोर
डोळ्यांची काळजी घेण्यासाठी काही महत्त्वाच्या टिप्स!
डोळ्यांची काळजी घेण्यासाठी काही महत्त्वाच्या टिप्स
डोळे
1/10

आजच्या काळात मोबाईल आपल्या दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग झाला आहे.
2/10

ऑफिसचे काम असो, ऑनलाईन शिक्षण असो किंवा मनोरंजन दिवसातील बराच वेळ मोबाईलच्या स्क्रीनकडे पाहण्यात जातो.
3/10

पण यामुळे डोळ्यांवर ताण येतो, दृष्टी कमी होण्याचा धोका वाढतो आणि डोळ्यांच्या अनेक समस्या उद्भवतात. त्यामुळे मोबाईल वापरताना डोळ्यांची काळजी घेणे खूप महत्त्वाचे आहे.
4/10

२०-२०-२० नियम पाळा : दर २० मिनिटांनी मोबाईलच्या स्क्रीनकडून नजर वळवून २० फूट अंतरावरच्या एखाद्या वस्तूकडे किमान २० सेकंद पहा. यामुळे डोळ्यांवरील ताण कमी होतो.
5/10

ब्राइटनेस योग्य ठेवा: मोबाईलची ब्राइटनेस लेव्हल खूप जास्त किंवा खूप कमी ठेवू नका. वातावरणानुसार ब्राइटनेस अॅडजस्ट करा.
6/10

ब्लू लाईट फिल्टर वापरा : मोबाईलमध्ये "Blue Light Filter" किंवा "Night Mode" ऑन करा. हे डोळ्यांना होणारा त्रास कमी करते.
7/10

मोबाईल डोळ्यांपासून दूर ठेवा: मोबाईल डोळ्यांच्या खूप जवळ धरून वापरू नका. किमान ३०-३५ सें.मी. अंतर ठेवून स्क्रीनकडे पहा.
8/10

जास्त वेळ सलग वापर टाळा: मोबाईल सतत तासन्तास पाहणे टाळा. मध्ये मध्ये ब्रेक घ्या.
9/10

डोळ्यांना पाणी शिंपडा: डोळे कोरडे पडल्यास थंड पाण्याने शिंपडल्याने आराम मिळतो.
10/10

योग्य झोप घ्या: दररोज किमान ७-८ तास झोप घेतल्यास डोळ्यांना ताजेतवाने वाटते.(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )
Published at : 19 Aug 2025 02:09 PM (IST)
आणखी पाहा























