एक्स्प्लोर
Photo: सवाई एकांकिका स्पर्धेत 'बारम'ची बाजी, 'उकळी' द्वितीय स्थानावर
सवाई एकांकिका स्पर्धेची सुमारे साडेतीन दशकांची वाटचाल ही सवाईचे स्पर्धक, प्रेक्षक, परीक्षक, परीक्षक पद्धतीतील प्रयोगशीलता, नामवंतांची आग्रही उपस्थिती अशा अनेक घटकांमुळे लक्षणीय आणि लक्षवेधी ठरते.
Sawai Ekankika Spardha
1/9

एकांकिकांच्या विषयांमधील विविध छटा असणारी स्पर्धा म्हणजे चतुरंग आयोजित सवाई एकांकिका स्पर्धा. तरुणाईच्या उत्साहाला उधाण आणणाऱ्या या स्पर्धेचं यंदाचं हे 34वं वर्ष होतं. अत्यंत चुरशीच्या झालेल्या या स्पर्धेत अखेर महर्षी दयानंद महाविद्यालयच्या 'बारम' या एकांकिकेने बाजी मारली. सर्वोत्तम एकांकिकेसह 'बारम' या एकांकिकेने अन्य चार पुरस्कारांवरही मोहोर उमटवली. याच एकांकिकेला सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक, ध्वनीसंयोजक, नेपथ्यकार आणि प्रेक्षक पारितोषिक मिळालं. या स्पर्धेची अंतिम फेरी मुंबईच्या रवींद्र नाट्यमंदिरात पार पडली.
2/9

यंदाच्या सवाईमध्ये आतापर्यंत गाजलेल्या 'उकळी' या कीर्ती महाविद्यालयाच्या एकांकिकेला दुसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागले. तर यासह उकळीला अन्य दोन पारितोषिक मिळाले. या एकांकिकेच्या लेखकाला सर्वोत्कृष्ट लेखक आणि नाटकातील मम्मी या पात्राला सवाई अभिनेत्री पारितोषिक मिळालं.
3/9

सवाई प्रथम - चतुरंग प्रतिष्ठान पुरस्कृत- 'बारम' एकांकिका, महर्षी दयानंद महाविद्यालय मुंबई.
4/9

सवाई द्वितीय - 'उकळी' एकांकिका, किर्ती एम डुंगरसी महाविद्यालय, मुंबई.
5/9

सवाई अभिनेता- प्रणव जोशी,- 'लेखकाचा कुत्रा' एकांकिका, पुणे.
6/9

• सवाई लेखक- चैतन्य देशपांडे- 'उकळी' एकांकिका.
7/9

सवाई दिग्दर्शक- यश पवार, ऋषिकेश मोहिते- 'बारम' एकांकिका.
8/9

•सवाई प्रेक्षक पारितोषिक - बारम एकांकिका.
9/9

दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर, अभिनेता दिपक करंजीकर आणि अभिनेत्री विभावरी देशपांडे यांनी परीक्षकाची भूमिका पार पाडली.
Published at : 26 Jan 2023 11:40 PM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
जळगाव
भारत
महाराष्ट्र
























