एक्स्प्लोर
Ashok Mama Marathi Serial Track: अशोक मामांसमोर येणार का अनिश - भैरवी च्या Contract Marriage चे सत्य?
Ashok Mama Marathi Serial: कलर्स मराठीवरील (Colours Marathi) लोकप्रिय मालिका अशोक मा.मा. (Ashok Mama) मध्ये सध्या एकामागोमाग एक धक्कादायक वळणं येताना दिसत आहेत.
Ashok Mama Marathi Serial
1/8

अर्जुन बेलवलकरच्या एन्ट्रीनंतर मालिकेत हास्याचा तडका आणि उत्सुकता यांचा उत्तम मिलाफ पाहायला मिळतो आहे.
2/8

अशोक मामा मालिकेत अर्जुन बेलवलकर ची एंट्री झाल्यापासून बऱ्याच मजेशीर घटना घडत आहेत तर त्याचं पात्रांशी असलेलं नातं देखील खुलतं चालेल आहे जे प्रेक्षकांना आवडत आहे.
3/8

मग ते मामा आणि त्याच्यातील असो वा मुलांचे आणि त्याचे असो. राधा आणि किश्या ची फिरकी घेण्याची संधी देखील त्याने सोडली नाहीये.
4/8

पण, आता मात्र मालिकेत एक अनोखे वळण येणार आहे ज्यामुळे अनिश - भैरवी आणि मामाच्या नात्यात काय बदल होतील हे हळूहळू कळेलच.
5/8

मात्र आता कथानकाला एक गंभीर वळण मिळताना दिसतंय. भैरवी, जी सध्या अनिशसोबत लग्नाच्या निर्णयावर संभ्रमात आहे, अर्जुनकडे सल्ला मागते.
6/8

पण जेव्हा ती अर्जुनला contract marriage बद्दल सांगते, तेव्हा तो हादरून जातो. 'याचा अर्थ?' असा प्रश्न विचारताच भैरवी सर्व सत्य उघड करते.
7/8

भैरवी त्याला contract marriage चे सत्य सांगते. आता हे सत्य अशोक मामांसमोर येणार का? आता सर्वांचे लक्ष लागले आहे ते अशोक मामांच्या प्रतिक्रिया कशा असतील याकडे.
8/8

हे सत्य त्यांच्यासमोर उघड होणार का? आणि झालंच तर मग मामा काय भूमिका घेणार? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
Published at : 28 May 2025 03:51 PM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
मुंबई
राजकारण
व्यापार-उद्योग


















