एक्स्प्लोर
Marathi Serial : कोणाचं नातं नव्याने बहरणार, तर जुन्या नात्यांची वीण घट्ट होणार; मालिकांमध्ये उत्साहात साजरी होणार वटपौर्णिमा
झी मराठी आणि स्टार प्रवाहवरील तुमच्या लाडक्या मालिकांमध्येही वटपौर्णिमेचा सण उत्साहात साजरा होणार आहे.

झी मराठी आणि स्टार प्रवाहवरील तुमच्या लाडक्या मालिकांमध्येही वटपौर्णिमेचा सण उत्साहात साजरा होणार आहे.
1/9

महाराष्ट्राची नंबर वन मालिका अर्थातच ठरलं तर मग मध्ये यंदाची वटपौर्णिमा खास ठरणार आहे.
2/9

सायली-अर्जुनचं नातं बहरु लागलं आहे. दोघांनीही एकमेकांवरच्या प्रेमाची कबूली दिली नसली तरी मनात मात्र जन्मोजन्मी आम्हाला एकमेकांची साथ लाभू दे अशी इच्छा व्यक्त केलीय. यंदा वटपौर्णिमेची पूजा सायली तर करणारच आहे पण सायलीसोबत अर्जुनही वडाभोवती सात फेऱ्या घेऊन हे व्रत पूर्ण करणार आहे.
3/9

आईपणाच्या सगळ्या जबाबदाऱ्या नेटाने पूर्ण करण्याचा प्रयत्न रमा करतेय. तिच्या या नव्या जबाबदारीमध्ये अक्षयही तिला मनापासून साथ देतोय. वटपौर्णिमेच्या पुजेसाठीही उसंत नसताना अक्षयने रमासाठी पुजेची सर्व तयारी केली. रमा आणि आपल्या लेकीसोबत वडाभोवती फेरे घेताना जबाबदारीही अशीच जन्मोजन्मी पूर्ण करेन हे वचन त्याने रमाला दिलंय.
4/9

'तुला शिकवीन चांगलाच धडा' मध्ये अक्षरा आणि अधिपतीच्या आयुष्यात नवीन नात्याची सुरुवात होणार आहे. दोघेही घर सोडून नवीन संसार सुरु करण्याच्या उंबरठयावर आहेत. अक्षराने, वट सावित्रीचा उपवास धरला आहे, अक्षराला इतके कष्ट घेताना बघून अधिपती देखील पूजेमध्ये तिच्या सोबत आहे.
5/9

'नवरी मिळे हिटलरला' मध्ये दुर्गा, कालिंदी समोर जहागीरदार घराण्याच्या एका अश्या प्रथेचा उल्लेख करते ज्या मध्ये जर नव्या नवरीने वडाच्या झाडाला 1001 फेऱ्या मारल्या तर संसार सुखाचा होतो. कालिंदीच्या मनात ती गोष्ट घर करून आहे आणि ती लीला कडून 1001 फेऱ्या मारून घेण्याचा निश्चय करते. फेऱ्या मारताना लीलाची तब्बेत बिघडते आता अभिराम ह्यात लीलाला कशी साथ देतो हे पाहणं रंजक असणार आहे.
6/9

'पारू' मालिकेत अहिल्यादेवी वटपौर्णिमेच्या निमित्ताने सर्वांसाठी जेवण बनवायचे ठरवते तर दुसरीकडे कोणाच्याही नकळत पारू वडाच्या झाडाची पूजा करायचे ठरवते. वटपौर्णिमेच्या दिवशी पारू आदित्यच्या ताटातलं उष्ट जेवण जेवते हे सगळं सावित्री पाहते. पारूचं सत्य सावित्रीसमोर येईल ? हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.
7/9

'शिवा' च्या पहिल्या वट सावित्री पूजेसाठी रामभाऊ आणि पूर्ण परिवार पूजेसाठी जातात. शिवा आपल्या पूजेची सुरवात करत असताना काही गुंड आशूच्या बहिणीची छेड काढण्याचा प्रयत्न करतात. आशु त्यांच्याशी दोन हात करायला जातो. पण ह्या हातापायीत आशूवर वार होतो तिकडे शिवा आशूच्या मदतीला येते. वट सावित्रीच्या दिवशी ही सावित्री आपल्या सत्यवानची रक्षा ह्या गुंडांना पासून कशी करणार हे पाहायला मिळणार.
8/9

'पुन्हा कर्तव्य आहे' मध्ये वसुंधरा आपल्या जुन्या नात्यांच्या धाग्यांना तोडून आकाश सोबत एक नवीन विश्व् उभारण्याचा निर्णय घेईल का हे ह्या वटपौर्णिमा विशेष मिळणार आहे.
9/9

सन मराठीवरील 'कॉन्स्टेबल मंजू' या मालिकेत मंजुने पोलिसांच्या गणवेशातच वटपौर्णिमेचे विधी पार पाडलेत.
Published at : 20 Jun 2024 02:15 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नाशिक
भारत
आयपीएल
क्राईम
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज


परशराम पाटील, एबीपी माझा
Opinion