एक्स्प्लोर
PHOTO : 'स्टार प्रवाह परिवार पुरस्कार 2022', रेड कार्पेटवर कलाकारांचा हटके अंदाज
Star Parivaar Award
1/9

दर्जेदार कार्यक्रमांच्या माध्यमातून रसिकांना मनोरंजनाची पर्वणी देणाऱ्या स्टार वाहिनीवर लवकरच 'स्टार प्रवाह परिवार पुरस्कार' पाहायला मिळणार आहे. स्टार प्रवाह परिवार पुरस्कारांचं हे दुसरं वर्ष आहे. मुलुंड येथील कालिदास नाट्यगृहामध्ये नुकताच हा रंगारंग सोहळा पार पडला. स्टार प्रवाहच्या कुटुंबातील सर्वच सदस्यांनी या खास सोहळ्याला हजेरी लावली होती. रेड कार्पेटवरचा कलाकारांचा हटके अंदाज लक्ष वेधणारा होता. एरव्ही स्टार प्रवाहच्या लोकप्रिय मालिकांमधील या लोकप्रिय कलाकारांना त्यांच्या व्यक्तिरेखेमध्ये आपण भेटत असतो. पण स्टार प्रवाह परिवार पुरस्काराच्या निमित्ताने या सर्व कलाकारांचा अनोखा अंदाज भाव खाऊन गेला. रविवार 3 एप्रिलला संध्याकाळी 7 वाजता हा दैदिप्यमान सोहळा स्टार प्रवाह वाहिनीवर पाहायला मिळणार आहे.
2/9

एरवी खाकी वर्दीत दिसणारी 'नवे लक्ष्य' मालिकेतील पोलीस इन्स्पेक्टर मोक्षदा मोहितेचा नऊवारी साडीतला मराठमोळा अंदाज
Published at : 14 Mar 2022 07:32 AM (IST)
आणखी पाहा























