एक्स्प्लोर
एक गाव, 7 खून, 542 दिवस, ही 7.3 रेटेड थ्रिलर Web Series सत्य घटनेवर आधारित; प्रत्येक एपिसोडमध्ये सस्पेन्स
OTT New Web Series : सध्या एक वेब सिरीज ओटीटीवर धुमाकूळ घालत आहे. या वेब सीरिजचं समीक्षकांकडूनही खूप कौतुक होत आहे. पण, अजुनही अनेकांना या वेब सीरिजबद्दल अनेकांना माहिती नाही.

OTT New Web Series
1/11

ही क्राईम थ्रिलर मालिका असून सत्य घटनेवर आधारित आहे. ज्यांना हॉरर आणि सस्पेन्स कंटेंट आवडतो त्यांना ही सीरिज नक्कीच आवडेल.
2/11

ओटीटीवर धुमाकूळ घालणाऱ्या क्राईम थ्रिलर सीरिजला IMDb नं 7.3 रेटिंग दिलं आहे. या सीरिजच्या शीर्षकावरुन साधारणतः कथानकाची कल्पना येते. पण तरीही, ही सीरिज शेवटपर्यंत खिळवून ठेवते.
3/11

एका गावात 7 खून होतात, पण ते कोण करतंय? का करतंय? याचा शोध कसा लागतो? या सर्व गोष्टींचा खळबळजनक खुलासा टप्प्या टप्प्यावर होतो.
4/11

ही वेब सीरिज 1972 च्या एका सत्य घटनेवर आधारित आहे. महाराष्ट्रातील मानवत गावातील ही गोष्ट आहे, जिथे अनेक प्रकारच्या अंधश्रद्धा आणि गुन्हे प्रचलित आहेत. गावात एकामागून एक सात जणांची हत्या होत आहे.
5/11

'मानवत मर्डर' असं या मालिकेचं नाव आहे. या मालिकेत महिला आणि मुलींची हत्या होत असल्याचं दाखवण्यात आलं आहे. त्यांचे मृतदेह वेगवेगळ्या ठिकाणी सापडले आहेत. खुन्याला पकडण्यासाठी एक वरिष्ठ पोलीस अधिकारी गावात येतो.
6/11

पोलीस अधिकाऱ्याची भूमिका आशुतोष गोवारीकर यांनी साकारली आहे. आशुतोष गोवारीकर यांनी 'लगान' आणि 'जोधा अकबर' यांसारखे चित्रपट दिग्दर्शित केले आहेत.
7/11

पोलीस प्रकरणाच्या तळापर्यंत जाण्यासाठी त्यांना गावातील प्रभावशाली आणि गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांची माहिती मिळते.
8/11

सीरिज जसजशी पुढे सरकते, तसतसा सस्पेन्स आणि थ्रिलर अधिक गडद होत जातो. ही मालिका तुम्ही सोनी लिव्हवर पाहू शकता.
9/11

या सस्पेन्स थ्रिलर क्राईम सीरिजचं पार्श्वसंगीत दृश्यांना जीवदान देतं. ही मालिका तुम्हाला शेवटपर्यंत गुंतवून ठेवते. ही मालिका हिंदी व्यतिरिक्त मराठी, मल्याळम, कन्नड, तमिळ आणि तेलुगु भाषेतही तुम्ही पाहू शकता.
10/11

'फूटप्रिंट्स ऑन द सॅन्ड ऑफ क्राईम' हे पुस्तक या गावात तपासासाठी आलेल्या व्यक्तीवर आधारित आहे. गावात एकापाठोपाठ होणाऱ्या हत्यांचं कोडं उलगडण्यासाठी तब्बल 542 दिवस लागले. हे पुस्तक रमाकांत कुलकर्णी यांनी लिहिलं आहे.
11/11

(PHOTO : YouTube Grab)
Published at : 22 Oct 2024 12:10 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
करमणूक
भविष्य
भारत
महाराष्ट्र
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
