एक्स्प्लोर
सात वर्षात एकही हिट चित्रपट नाही; तरीही ही अभिनेत्री आहे सर्वात श्रीमंत!
बॉलिवूडच्या एका अभिनेत्रीचा हॉलिवूडमध्येही चांगलाच बोलबाला आहे. मागील सात वर्षात अभिनेत्रीचा एकही चित्रपट सुपरहिट ठरलेला नाही.

Priyanka Chopra
1/12

बॉलिवूडच्या (Bollywood) अनेक अभिनेत्रींनी (Actress) आपल्या मेहनतीच्या जोरावर स्वत:ला सिद्ध केलं आहे. आपल्या कामाच्या माध्यमातून या अभिनेत्री लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचल्या आहेत.
2/12

बॉलिवूड अभिनेत्रींचं मानधन अभिनेत्यांपेक्षा कमी असतं. पण आजच्या घडीला अभिनेत्रीदेखील तगडं मानधन घेत आहेत. काही अभिनेत्री तर अभिनेत्यांपेक्षा जास्त पैसे चार्ज करत आहेत. बॉलिवूडची 'देसी गर्ल' अर्थात प्रियंका चोप्राचा (Priyanka Chopra) देशभरात चांगलाच बोलबाला आहे.
3/12

बॉलिवूडसह हॉलिवूडमध्येही ही अभिनेत्री राज्य करताना दिसत आहे. तसेच प्रियंका चोप्रा बॉलिवूडची सर्वात श्रीमंत अभिनेत्री (Bollywood Highest Paid Actress) आहे.
4/12

बॉलिवूडची सर्वात श्रीमंत अभिनेत्री दीपिका पादुकोण (Deepika Padukone) किंवा आलिया भट्ट (Alia Bhatt) असेल असं काहींना वाटतंय. पण बॉलिवूडच्या सर्वात श्रीमंत अभिनेत्रीच्या नावावर 'देसी गर्ल' प्रियंका चोप्राने आपलं नाव कोरलं आहे.
5/12

फोर्ब्सच्या एका रिपोर्टनुसार,'देसी गर्ल' आपल्या प्रत्येक प्रोजेक्टचे 40 कोटी रुपये चार्ज करते. हॉलिवूडमध्ये काम केल्याने प्रियंका चांगलच मानधन घेते.
6/12

प्रियंका हॉलिवूडमधून $5 मिलियन कोटींची कमाई करते. प्रियंकाने नुकत्याच आलेल्या 'सिटाडेल' या वेबसीरिजसाठी एवढं मानधन घेतलं होतं. भारतात एका चित्रपटासाठी प्रियंका 14-20 कोटी रुपयांचं मानधन घेते.
7/12

प्रियंकाने 2010 च्या मध्यापर्यंत 'मेरी कॉम', 'बाजीराव मस्तानी' आणि 'दिल धडकने दो' सारख्या हिट चित्रपटांमध्ये काम केलं आहे. असे सुपरहिट चित्रपट दिल्यानंतर प्रियंकाचा समावेश बॉलिवूडच्या टॉप अभिनेत्रींमध्ये करण्यात आला.
8/12

बॉलिवूड गाजवल्यानंतर अभिनेत्रीची पाऊले हॉलिवूडकडे वळाली. अभिनेत्रीचा 2017 मध्ये आलेला बेवॉच हा हॉलिवूडपट चांगलाच गाजला. त्यानंतर प्रियंका किड लाइक जेक, इजंट इट रोमांटिक, वी कैन बी हीरोज, द मॅट्रिक्स रिसरेक्शन्स आणि लव अगेन या हॉलिवूड चित्रपटांमध्ये झळकली.
9/12

प्रियंकाने द स्काई इज पिंक आणि द व्हाइट टायगर या चित्रपटांतही काम केलं आहे. प्रियंकाच्या दमदार सादरीकरणाचं नेहमीच कौतुक होत आलं आहे.
10/12

प्रियंका चोप्रानंतर दीपिका पादुकोण सर्वाधित मानधन घेणारी अभिनेत्री आहे. दीपिका पादुकोण एका चित्रपटासाठी 15-30 कोटी रुपयांचं मानधन घेते.
11/12

त्यानंतर कंगना रनौत आणि कतरिना कैफचा नंबर लागतो. प्रत्येक चित्रपटासाठी त्या 25 कोटी रुपये मानधन घेतात.
12/12

आलिया भट्ट, करीना कपूर, अनुष्का शर्मा आणि ऐश्वर्या राय बच्चन या अभिनेत्री एका चित्रपटासाठी 10-20 कोटी रुपये चार्ज करतात. (pc:/priyankachopra/ig)
Published at : 18 Sep 2024 03:51 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
सोलापूर
बातम्या
भारत
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
