ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑक्टोबर 2025 | बुधवार
दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.

1. मतदार यादीसंदर्भातील घोळ संपुष्टात येत नाहीत तोपर्यंत निवडणुका पुढे ढकला; निवडणूक आयुक्तांच्या भेटीनंतर ठाकरे बंधूंची मागणी, काँग्रेस-राष्ट्रवादीचीही सहमती https://tinyurl.com/2p3mkk4y विरोधकांचा केवळ नरेटिव्ह तयार करण्याचा प्रयत्न, मतदार यादीत सुधारणा करण्यास आमचा पूर्ण पाठिंबा, देवेंद्र फडणवीस यांचं वक्तव्य https://tinyurl.com/3xkmpb9j
2. राज ठाकरे कडाडले, जयंत पाटलांनी पुरावे दाखवले; उद्धव ठाकरे म्हणाले, निवडणुका रद्द करा, निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांवर प्रश्नांची सरबत्ती https://tinyurl.com/2v5du4b9 निवडणूक आयोगाला आम्ही महत्त्वाचे पुरावे दिले; आम्ही अनंत चुका दाखवल्या, पत्ते अपूर्ण, घराच्या चुकीच्या नोंदी, जयंत पाटील यांनी बैठकीतला तपशील सांगितला https://tinyurl.com/2a76c3m7
3. नक्षलवादी भूपती गडचिरोलीत महाराष्ट्र पोलिसांसमोर शरण, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत आत्मसमर्पण,60 नक्षलवाद्यांसह शरणागती https://tinyurl.com/2hhptv8t आता बंदुकीचा नक्षलवाद संपत आहे, शहरी नक्षलवाद हेच खरं चॅलेंज, अराजकतावाद्यांना पराभूत करु, देवेंद्र फडणवीस यांचं वक्तव्य https://tinyurl.com/3jzjwa3r
4. एसटी बँकेच्या सभेत राडा, सदावर्ते गट आणि शिवसेना नेते आनंदराव अडसूळ गटाच्या सचालकांमध्ये फ्री स्टाईल हाणामारी, वाद पोलीस ठाण्यात https://tinyurl.com/2d6t99jt
5. 'रवींद्र धंगेकरांना आवरा नाहीतर युतीत मिठाचा खडा', भाजपची उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडे तक्रार; पक्ष म्हणून नाही पुणेकर म्हणून प्रश्न विचारणार, रवींद्र धंगेकरांची भूमिका https://tinyurl.com/4r5p5vyb
6. आपल्या बोलण्यामुळं दुसरा समाज नाराज होणार नाही याची खबरदारी घ्या, अजित पवारांच्या आमदारांसह पदाधिकाऱ्यांना सूचना https://tinyurl.com/3ur8eyc5 सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी गोंदियाचं पालकमंत्रीपद सोडलं; इंद्रनील नाईक गोंदियाचे नवीन पालकमंत्री https://tinyurl.com/2s3fhyrb
7. शेतकऱ्यांना विदेश दौऱ्यासाठी आता 2 लाख रुपये अनुदान मिळणार, योजनेत मोठा बदल, कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांची माहिती https://tinyurl.com/bdct252m
8. बिहार विधानसभा निवडणुकीसाठी नितीशकुमारांच्या जदयूकडून 57 उमेदवारांची पहिली यादी जाहीर; पहिल्या यादीत मुस्लिम नेत्याला संधी नाही https://tinyurl.com/32n3tp8w भाजपकडून दुसऱ्या यादीत 12 नावांची घोषणा,गायिका मैथिली ठाकूरला उमेदवारी, अलिनगर मतदारसंघातून लढवणार https://tinyurl.com/2s44hnu5
9. तामिळनाडू सरकार हिंदीवर बंदी घालणारे विधेयक आणण्याची शक्यता, हिंदी चित्रपट, गाणी आणि होर्डिंग्जवरही बंदी लागणार, स्टॅलिन सरकारची कायदेतज्ज्ञांसोबत चर्चा https://tinyurl.com/3p8upu23
10. ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी भारताचा संघ रवाना, रोहित शर्मा आणि विराट कोहलीला दिल्लीत एकत्र पाहताच चाहते भावूक, 19 ऑक्टोबरला पहिली वनडे मॅच https://tinyurl.com/3hzzunuv
एबीपी माझा स्पेशल
गंभीर पत्रकार परिषदेत राज ठाकरेंनी 'तो' जोक मारला, उद्धव ठाकरेंसह जयंत पाटील, आव्हाड सर्वजण हसतच राहिले! https://tinyurl.com/2f9739u3
भूपतीसह 60 नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण कसं केलं? देवेंद्र फडणवीस यांनी A टू Z सर्व सांगितलं... https://www.youtube.com/watch?v=qys595l9hxs
एबीपी माझा Whatsapp Channel- https://whatsapp.com/channel/0029Va9dq2u6buMTUrb4GM0w
























