मेल्यानंतर आपलं अंत्यदर्शन घ्यायला किती लोक येतील? पठ्ठ्याने स्वतःची अंत्ययात्रा काढली, सत्य समजल्यावर लोकांनी...
Bihar Viral News : हवाई दलातून निवृत्त झालेल्या एका कर्मचाऱ्याने स्वतःच्या खर्चाने स्मशानभूमी बांधली आणि अजब शक्कल लढवत स्वतःचीच अंत्ययात्रा काढली.

Bihar Viral Video : आपल्या आजूबाजूला अनेक विक्षिप्त लोक राहतात, त्याचा प्रत्यय अनेकदा येतो. सोशल मीडिया असो वा कोणतेही प्लॅटफॉर्म, लोकांचे लक्ष वेधून घेण्यासाठी काय काय शक्कल लढवतील हे सांगता येत नाही. बिहारमध्ये (Bihar) एका हवाई दलातून (Air Force Veteran) निवृत्त झालेल्या सैनिकाने असं काही केलं की त्याला वेडं म्हणावं की काय असा प्रश्न अनेकांना पडला. आपण मेल्यावर आपल्या अंत्ययात्रेला कोण कोण येतं हे पाहण्यासाठी या व्यक्तीने मरण्याचं नाटक केलं आणि स्वतःची अंत्ययात्राही काढली.
बिहारच्या गया जिल्ह्यातील कोंची गावात वायुसेनेतून निवृत्त झालेले 74 वर्षीय मोहनलाल (Mohan Lal Bihar) नावाच्या ज्येष्ठ नागरिकाने आपल्या मृत्यूचं नाटक रचलं आणि अंत्ययात्राही (Funeral Procession) काढली. या विचित्र पण भावनिक घटनेची चर्चा सध्या सोशल मीडियावर (Social Media) जोरदार रंगली आहे.
Bihar Viral Video : मेल्यानंतर कोण येईल हे पाहण्यासाठी नाटक
मोहनलाल यांनी आपल्या गावात लोकांना अंत्यसंस्कारासाठी योग्य जागा मिळावी म्हणून स्वतःच्या खर्चाने, तब्बल सहा लाख रुपये खर्च करून स्मशानभूमी Cremation Ground) बांधले. पावसाळ्यात गावकऱ्यांना प्रेतांना अग्नी देताना खूप अडचणी यायच्या, त्यामुळे त्यांनी 6 लाख रुपयांच्या खर्चाने नवीन स्मशानभूमी उभारली.
या उपक्रमाची माहिती अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचावी म्हणून त्यांनी हटके आयडिया लढवली. स्वतःच्या ‘मृत्यू’ची बातमी पसरवली आणि तिरडीवर स्वतःचा पुतळा ठेवला आणि त्याची अंत्ययात्राही काढली.
मोहन लाल यांच्या अंत्ययात्रेत गावातील शेकडो लोक सहभागी झाले. अनेकांनी मोहनलाल यांच्या ‘मृत्यू’वर अश्रू ढाळले, काहींनी फुलांचे हारही अर्पण केले. थोड्या वेळानंतर जेव्हा मोहनलाल स्वतः हसत समोर आले, तेव्हा लोक अवाक् झाले. 'मला फक्त एवढं जाणून घ्यायचं होतं की, माझ्या जाण्यानंतर कोण कोण माझ्या अंत्ययात्रेला येईल. या ठिकाणी झालेली गर्दी पाहता लोक खरंच माझ्यावर किती प्रेम करतात हे समोर आलं.”
Mohanlal Bihar Viral News : सोशल मीडियावर चर्चा
गावातील लोकांनी त्यांच्या या उपक्रमाचं कौतुक केलं. अनेकांनी सांगितलं की, मोहनलाल यांच्यामुळेच आता गावात अंत्यसंस्कारासाठी कायमस्वरूपी जागा उपलब्ध झाली आहे.
दरम्यान, या घटनेचा व्हिडिओ इंटरनेटवर व्हायरल झाला असून नेटिझन्स (Netizens) वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. एका यूजरने लिहिलं, 'हे लोक भन्नाट आहेत पण हृदयाने चांगले आहेत'. तर दुसऱ्याने लिहिलं, 'लोकांचं प्रेम पाहण्यासाठी हा आयडिया मस्त आहे'. तर आणखी एका यूजरने म्हटलं, 'चाचा ऑन फायर आहेत, काय भन्नाट प्रयोग केला आहे.'
























