एक्स्प्लोर

25 वर्षांच्या तरुणीच्या आतड्यात झपाट्यानं वाढली भलीमोठी गाठ, बघून डॉक्टरही चक्रावल्या ; तब्बल 15 सेमी गाठ काढण्यात यश

पोटातील प्रसारित क्षयरोगाचे प्रमाण हे एकूण क्षयरोगाच्या रुग्णाच्या तुलनेत केवळ 2 ते 3% असते. 1 कोटी लोकसंख्येमागे केवळ 7 जणांना हा आजार होत असल्याचे दिसून येते.

Pune: केवळ 25 वर्षीय तरुण महिलेच्या पोटात झपाट्याने वाढणारी मोठी गाठ असल्याने ती उपचारासाठी दाखल झाली होती. सुरुवातीला ही गाठ मोठ्या गर्भाशयातील फायब्रॉईड (uterine fibroid) असल्याचा संशय होता. मात्र शस्त्रक्रियेदरम्यान अनपेक्षित निष्कर्ष समोर आला, ही गाठ गर्भाशयाशी संबंधित नसून आतड्यांच्या भोवती असणाऱ्या मेसेन्टरी भागातून निर्माण झालेली स्पिंडल सेल ट्यूमर (Spindle Cell Tumor) असल्याचे स्पष्ट झाले.

25 वर्षीय तरुणीत जगातील पहिलेच निदान 

ही जटिल शस्त्रक्रिया स्त्रीरोगतज्ञ डॉ. गौरी जगदाळे यांच्या नेतृत्वाखाली मदरहुड हॉस्पिटल, खराडी येथे यशस्वीरीत्या पार पडली. शस्त्रक्रियेदरम्यान संपूर्ण गाठ सुरक्षितपणे काढून टाकण्यात आली. १५ सेमी आकाराची हि गाठ  पुढील तपासणीसाठी पाठविण्यात अली होती. तपासणीत ही गाठ Low Malignant Potential असलेली (कॅन्सरकारकतेच प्रमाण अत्यल्प असलेली, जवळपास नसलेली), स्पिंडल सेल ट्युमर (Spindle Cell Tumor) असल्याचे निदान झाले. जागतिक पातळीवर उपचारणाची जी माहिती उपल्बध आहे, त्या माहितीच्या अभ्यासानुसार, चाळीशीच्या आतील महिलेस हा ट्युमर इतका मोठा आकाराचा होण्याची हि जगातील पहिलीच वेळ आहे. त्यातच आणखी एक आश्चर्यकारक निष्कर्ष समोर आला, रुग्णाच्या ऊतींच्या मॉलिक्युलर चाचणीत पोटातील प्रसारित क्षयरोग (Disseminated Abdominal Tuberculosis) सुद्धा आढळला. म्हणजेच एका रुग्णामध्ये दोन वेगळे आणि दुर्मिळ आजार मेसेन्टरी ट्यूमर आणि पोटातील प्रसारित क्षयरोग एकाच वेळी आढळले, हे जगातील दुर्मिळात दुर्मिळ उदाहरण म्हणावे लागेल. पोटातील प्रसारित क्षयरोगाचे प्रमाण हे एकूण क्षयरोगाच्या रुग्णाच्या तुलनेत केवळ 2 ते 3% असते. 1 कोटी लोकसंख्येमागे केवळ 7 जणांना हा आजार होत असल्याचे दिसून येते.

सध्या रुग्णाची प्रकृती स्थिर

डॉ. गौरी जगदाळे म्हणाल्या, “या रुग्णाचे लक्षणे पाहता सुरुवातीला सामान्य फायब्रॉईडचा निष्कर्ष निघाला व शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र शस्त्रक्रियेनंतर आणि तपशीलवार तपासण्यांमुळे हे अत्यंत दुर्मिळ निदान असल्याचे समोर आले. पोटातील गाठींच्या निदानात नेहमी व्यापक तपासणी आणि मॉलिक्युलर चाचण्या करणे आवश्यक आहे, विशेषतः क्षयरोग प्रचलित असलेल्या भागात. सध्या रुग्णाची प्रकृती स्थिर असून तिच्यावर ऑंकोलॉजिकल तसेच क्षयरोगावरील उपचार (anti-tubercular treatment) सुरू आहेत. पुढील काही वर्षे नियमित फॉलो-अप करून गाठीची पुनर्वाढ होत नाही यावर लक्ष ठेवले जाईल, असे डॉ. जगदाळे यांनी सांगितले. या शस्त्रक्रियेसाठी स्त्रीरोगतज्ज्ञ गौरी जगदाळे यांच्यासह शल्यचिकित्सक डॉ. सुशील देशमुख, भूलतज्ज्ञ डॉ. मोनाली व मदरहूड रुग्णालयातील टीमचे सहकार्य लाभले.

Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )

Calculate The Age Through Age Calculator

शिवानी पांढरे
Read More
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

NEET पेपरफुटीचा मास्टरमाईंड सापडला, पुण्यातील सेवानिवृत्त प्राध्यापक पी व्ही कुलकर्णीला अटक, CBI ची मोठी कारवाई
NEET पेपरफुटीचा मास्टरमाईंड सापडला, पुण्यातील सेवानिवृत्त प्राध्यापक पी व्ही कुलकर्णीला अटक, CBI ची मोठी कारवाई
हडपसर बॉम्ब प्रकरण! आरोपीने अवघ्या 400 रुपयात बॉम्ब सदृश वस्तू बनवली, पोलिसांनी दिली धक्कादायक माहिती
हडपसर बॉम्ब प्रकरण! आरोपीने अवघ्या 400 रुपयात बॉम्ब सदृश वस्तू बनवली, पोलिसांनी दिली धक्कादायक माहिती
Pune Hospital Bomb Case: यूट्यूब पाहून बनवला बॉम्ब; उपचाराच्या पैशांसाठी हॉस्पिटलला लुटण्याचा होता प्लॅन, हडपसर बॉम्ब प्रकरणात पुणे पोलीस आयुक्तांचा मोठा खुलासा!
यूट्यूब पाहून बनवला बॉम्ब; उपचाराच्या पैशांसाठी हॉस्पिटलला लुटण्याचा होता प्लॅन, हडपसर बॉम्ब प्रकरणात पुणे पोलीस आयुक्तांचा मोठा खुलासा!
Fuel Saving Appeal : मोदींच्या आवाहनानंतर काही जण सायकलवर; काहीजण बैलगाडीने पोहोचले पालिकेत; तर पिंपरी चिंचवडच्या महापौरांनी परदेशी दौरा केला रद्द
मोदींच्या आवाहनानंतर काही जण सायकलवर; काहीजण बैलगाडीने पोहोचले पालिकेत; तर पिंपरी चिंचवडच्या महापौरांनी परदेशी दौरा केला रद्द

व्हिडीओ

Raju Shetty Protest :राजू शेट्टींना फरफटत नेलं, काजू आंबा उत्पादक आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतलं
NEET UG 2026 Re-Exam Date मोठी बातमी: पेपरफुटीमुळे रद्द झालेल्या NEET ची पुनर्परीक्षा 21 जूनला होणार
Petrol Diesel Price Hike : मोठी बातमी, पेट्रोल 3 रुपये तर डिझेल 3.11 रुपयांनी महागलं
Pune Hospital Bomb Case | हॉस्पिटलमध्ये बॉम्ब, सुरक्षेची बोंब | ABP Majha Special Report
Inflation Rate Hike | महागाईचा भडका, धोरणांचा फटका; खापर युद्धावर फोडणं योग्य? | | Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Punjab Kings: श्रेयस अय्यरच्या पंजाब किंग्जची प्लेऑफची वाट खडतर, सलग पाच पराभवांमुळं चित्र बदललं, प्लेऑफचं समीकरण जाणून घ्या? 
पंजाब किंग्जची प्लेऑफची वाट खडतर, सलग पाच पराभवांमुळं चित्र बदललं, प्लेऑफचं समीकरण जाणून घ्या? 
Bhiwandi : प्रेमसंबंधाला नकार दिल्याचा संताप, 33 वर्षीय महिलेला संपवून मृतदेह जाळला, भिवंडीत आरोपी अटकेत
प्रेमसंबंधाला नकार दिल्याचा संताप, 33 वर्षीय महिलेला संपवून मृतदेह जाळला, भिवंडीत आरोपी अटकेत
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 मे 2026 |शुक्रवार
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 मे 2026 |शुक्रवार
सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश म्हणाले, 'बेरोजगार तरुण झुरळांसारखे असतात, ते मीडिया, सोशल मीडिया आणि आरटीआय कार्यकर्ते बनून व्यवस्थेवर हल्ला करतात'
सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश म्हणाले, 'बेरोजगार तरुण झुरळांसारखे असतात, ते मीडिया, सोशल मीडिया आणि आरटीआय कार्यकर्ते बनून व्यवस्थेवर हल्ला करतात'
Beed Land Scam : बीडचे तत्कालीन जिल्हाधिकारी अविनाश पाठकांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी, 310 कोटींच्या भूसंपादन घोटाळ्यात कारवाई 
बीडचे तत्कालीन जिल्हाधिकारी अविनाश पाठकांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी, 310 कोटींच्या भूसंपादन घोटाळ्यात कारवाई 
'फडणवीस परिणाम भोगावे लागतील, आम्ही गुन्हा केलेला नाही' काजू, आंबा उत्पादक शेतकऱ्यांसाठी सर्व विरोधक रस्त्यावर उतरत एकवटताच मुंबई पोलिसांनी फरफटत नेलं, राजू शेट्टींचा संताप
'फडणवीस परिणाम भोगावे लागतील, आम्ही गुन्हा केलेला नाही' काजू, आंबा उत्पादक शेतकऱ्यांसाठी सर्व विरोधक रस्त्यावर उतरत एकवटताच मुंबई पोलिसांनी फरफटत नेलं, राजू शेट्टींचा संताप
Congress Leader: काँग्रेसचे नेत्याचे सर्पदंशाने निधन; राजकीय अन् वैद्यकीय क्षेत्रात हळहळ, पायावर जखमेच्या खुणा, नेमकं काय घडलं?
काँग्रेसचे नेत्याचे सर्पदंशाने निधन; राजकीय अन् वैद्यकीय क्षेत्रात हळहळ, पायावर जखमेच्या खुणा, नेमकं काय घडलं?
'हा तर निव्वळ मूर्खपणाचा विषय, मी जर माझं घरदार सोडून करत असेल तर..' किंग कोहली गंभीर आणि आगरकरांवर भलताच संतापला
'हा तर निव्वळ मूर्खपणाचा विषय, मी जर माझं घरदार सोडून करत असेल तर..' किंग कोहली गंभीर आणि आगरकरांवर भलताच संतापला
Embed widget