एक्स्प्लोर
निलेश साबळे, भाऊ कदम यांची अफलातून जुगलबंदी; प्रेक्षकांसाठी 'ढिंचॅक दिवाळी'ची पर्वणी
ढिंचॅक दिवाळी साजरी करणार आपला स्टार प्रवाह परिवार, विनोदाचं अचूक टायमिंग साधून खळखळून हसवण्यासाठी येणार आहेत महाराष्ट्राचे लाडके विनोदवीर अर्थातच निलेश साबळे आणि भाऊ कदम.
Nilesh Sable and Bhau Kadam
1/8

सणांची मजा तेव्हा द्विगुणीत होते जेव्हा संपूर्ण परिवार एकत्र येतो. गणेशोत्सव जल्लोषात साजरा केल्यानंतर आता स्टार प्रवाह परिवार सज्ज झालाय तो ढिंचॅक दिवाळी साजरी करण्यासाठी.
2/8

फराळा इतकाच खमंग कॉमेडीचा तडका आणि फटाक्यांच्या आतषबाजीप्रमाणे लखलखते कलाकारांचे परफॉर्मन्स दिवाळी विशेष कार्यक्रम आणखी स्पेशल करणार आहेत. स्टार प्रवाहच्या परिवारासोबतच यंदाची दिवाळी गाजवणार आहे नवी जोडी.
3/8

निलेश साबळे आणि भाऊ कदम यांना एकत्र पहाण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्र उत्सुक होता. अखेर ही प्रतीक्षा संपणार आहे. स्टार प्रवाहच्या ढिंचॅक दिवाळी कार्यक्रमाच्या निमित्ताने ही जोडी पुन्हा एकत्र येतेय.
4/8

प्रेक्षकांप्रमाणेच भाऊ कदम आणि निलेश साबळे देखिल या कार्यक्रमासाठी प्रचंड उत्सुक आहेत. याविषयी सांगताना डॉ. निलेश साबळे म्हणाले, ‘खूप दिवसांपासून प्रेक्षक वाट पहात होते.
5/8

दिवाळीच्या शुभमुहूर्तावर मी आणि भाऊ कदम स्टार प्रवाहच्या ढिंचॅक दिवाळी कार्यक्रमात काहीतरी भन्नाट घेऊन येतोय. भाऊसोबत काम करताना नेहमीच मजा येते.
6/8

भाऊला मी कळलोय आणि मला भाऊ कळलाय असं म्हण्टलं तरी चालेल. गेली १५ वर्ष आम्ही एकत्र काम करतोय. भूमिकेचं सोनं करणारा नट लेखकाला हवा असतो. भाऊ कदमचं पण काहीसं असंच आहे.
7/8

प्रत्येक भूमिकेचं तो सोनं करतो. या कार्यक्रमातही प्रेक्षकांसाठी निखळ मनोरंजन असेल अशी भावना निलेश साबळे यांनी व्यक्त केली.भाऊ कदम म्हणाले, यंदाची दिवाळी खऱ्या अर्थाने ढिंचॅक असणार आहे. निलेश साबळेसोबत इतक्या वर्षांची मैत्री आहे.
8/8

हीच मैत्री निराळ्या ढंगात प्रेक्षकांसमोर येईल. दिवाळीला हास्याचा फराळ प्रेक्षकांसमोर सादर करणार आहोत तेव्हा पाहायला विसरु नका ढिंचॅक दिवाळी रविवार १२ ऑक्टोबरला संध्याकाळी ७ वाजता फक्त स्टार प्रवाहवर.
Published at : 10 Oct 2025 12:52 PM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
























