एक्स्प्लोर
आईच्या दुसऱ्या लग्नाची वाट पाहतोय मालयकाचा लेक अरहान खान!
मलायका अरोरा आणि अरबाज खान लेक अरहान खान याने त्याच्या डम्ब बिर्याणी या पॉडकास्टमध्ये आपल्या आईची आणि अभिनेत्री मलायकाची मुलाखत घेतली.
Malaika Arora,
1/8

अभिनेत्री मलायका अरोरा (Malaika Arora) ही मागील काही काळापासून तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे बरीच चर्चेत आलीये.
2/8

आधी अरबाज खानसोबत (Arbaz Khan) तोडलेल्या नात्यामुळे तर कधी अर्जुन कपूरसोबत (Arjun Kapoor) झालेल्या ब्रेकअपमुळे, मलायकाचं आयुष्य हे कायमच चर्चेचा विषय ठरलंय. त्यातच आता तिचा लेकही तिच्या दुसऱ्या लग्नाच्या मागे लागल्याचं पाहायला मिळतंय. नुकतच त्याने एका पॉडकास्टदरम्यान तिला तिच्या दुसऱ्या लग्नाविषयी विचारलं.
3/8

मलायका अरोरा आणि अरबाज खान लेक अरहान खान याने त्याच्या डम्ब बिर्याणी या पॉडकास्टमध्ये आपल्या आईची आणि अभिनेत्री मलायकाची मुलाखत घेतली. यावेळी मलायकाने अनेक मुद्द्यांवर भाष्य केल्याचं पाहायला मिळालं. काही दिवसांपूर्वी मलायका आणि अर्जुन कपूर यांच्या नात्यात दुरावा आल्याचं जाहीर झालं होतं. त्यानंतर मलायका अरोरा लग्न कधी करणार याची उत्सुकता सर्वांना लागून राहिली होती. आता या सगळ्या प्रश्नांची उत्तर मलायकाने दिली आहे.
4/8

अरहानने यावेळी आपल्या आईचा हात धरत तिला प्रश्न विचारला की, संपूर्ण जगाला माहिती करुन घ्यायचं आहे की तू लग्न कधी करणार आहे. मला आता तुझ्या लग्नाची तारीख हवी आहे, मला सगळ्या गोष्टी जाणून घ्यायच्या आहेत.
5/8

यावर मलायका म्हणाली, की मी या प्रश्नाचं उत्तर नाही देऊ शकत. कारण या प्रश्नाचं उत्तर माझ्याकडेच नाहीये तर मी यावर काय बोलणार. पण मला असं वाटतं की सध्या मी माझ्या आयुष्यातला सगळ्यात बेस्ट काळात आहेत आणि मी माझं बेस्ट आयुष्य जगतेय.
6/8

दरम्यान यावेळी मलायकाने अरहानला तिची कोणती सवय त्याला आवडत नाही, याबद्दल विचारलं.
7/8

यावेळी अरहानने सांगितलं की, 'तु तुझ्या कामाच्या बाबतीत फार एकाग्र आहे. तुला तुझ्या कामापुढे काहीच दिसत नाही. त्यामुळे तू स्वत: कडे लक्ष द्यायला हवंस. थोडा तुझ्यासाठी वेळ काढायला हवा.' या मुलाखतीमध्ये मलायकाने अरहानसमोर अनेक मुद्द्यांवर तिची अगदी परखड मतं मांडली आहे.
8/8

मुळे सध्या मलायकाची ही उत्तरं सिनेसृष्टीत चर्चेचा विषय ठरला असल्याचं पाहायला मिळतंय. (pc:malaikaaroraofficial/ig)
Published at : 20 Apr 2024 04:29 PM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
हिंगोली
व्यापार-उद्योग
व्यापार-उद्योग
























