फॅशनमुळे आणि अतरंगी स्टाईलमुळे नेहमी चर्चेत असणारी उर्फी जावेदचे (Urfi Javed) फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. उर्फी ही कधी प्लास्टिकचा, तर कधी सेप्टीपीन्सपासून तयार केलेला ड्रेस घालून फोटोशूट करते. अनेक लोक उर्फीला तिच्या या फॅशनमुळे ट्रोल करतात तर काही जण तिचं कौतुक देखील करतात.(photo:urf7i/ig)
2/6
उर्फीच्या वैयक्तिक आयुष्याबाबत जाणून घेण्यासाठी तिचे चाहते उत्सुक असतात. अनेक जण तिच्याबाबतचे प्रश्न गूगलवर सर्च देखील करतात. जाणून घेऊयात उर्फीबाबत लोकांनी सर्च केले काही प्रश्न.. (photo:urf7i/ig)
3/6
उर्फीच्या कुटुंबाबद्दल जाणून घेण्यासाठी तिचे चाहते हा प्रश्न गूगलवर सर्च करतात. उर्फीच्या वडिलांचे नाव Ifru जावेद आहे. उर्फीचे वडील आणि तिची आई हे दोघे वेगळे राहतात. उर्फी तिच्या कुटुंबासोबत राहात नाही. उर्फीच्या आईचे नाव जाकिया सुल्ताना आहे. तिला असफी आणि डॉली जावेद या दोन बहिणी आहेत. एका मुलाखतीमध्ये उर्फीनं सांगितलं की, तिचे वडील तिला फिजीकली आणि मेंटली अब्यूज केलं होतं. त्यानंतर उर्फी तिच्या आई आणि बहिणीसोबत वडिलांना सोडून राहायला लागली. तिच्या वडिलांनी दुसरे लग्न देखील केले. (photo:urf7i/ig)
4/6
बिग बॉस ओटीटीच्या पहिल्या सिझनमधून उर्फी प्रेक्षकांच्या भेटीस आली. या शोमुळे तिला लोकप्रियता मिळाली. सोशल मीडियावर फोटोमुळे उर्फी ही चर्चेत असते.(photo:urf7i/ig)
5/6
उर्फीचे लग्न झालेले नाही. उर्फी तिच्या रिलेशनशिपबाबत कोणतीही माहिती देत नाही. (photo:urf7i/ig)
6/6
उर्फी ही अभिनेत्री आहे. तिनं ऐ मेरे हमसफर, जीजी मां, मेरी दुर्गा, बेपनाह, चंद्र नंदिनी या शोमध्ये काम केलं आहे. 2015 मधील टेडी-मेडी फॅमिली या मालिकेमधून उर्फीनं अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं. (photo:urf7i/ig)