एक्स्प्लोर
Sumona Chakravarti | खऱ्या आयुष्यात खूपच ग्लॅमरस आहे 'द कपिल शर्मा शो'मधील सुमोना चक्रवर्ती
संपादित छायाचित्र
1/6

सुमोना चक्रवर्ती या अशा कॉमेडी स्टारपैकी एक आहेत, ज्यांचे लाखो चाहते आहेत. कपिल शर्मासोबत प्रेक्षकांना मनमुराद हासवणारी सुमोना एक प्रतिभावान अभिनेत्री देखील आहे. द कपिल शर्मा शोमधून रात्रीत स्टार बनलेल्या सुमोना सिंगच्या वैयक्तिक आयुष्यबद्दल सांगायचं झालं तर ती खूप ग्लॅमरस आणि हॉट आहे. सुमोना सोशल मीडियावर खूप अॅक्टिव असते. सुमोनाचे इन्स्टाग्रामवर दहा लाखाहून जास्त फॉलोअर्स आहेत. यावरुन तिची क्रेझ आहे हे लक्षात येईल. आज तुम्हाला सुमोनाच्या खऱ्या जीवनाशी संबंधित काही फोटो दाखवणार आहोत. ज्यात ती खूपच सुंदर दिसत आहे.
2/6

कॉमेडी क्विन सुमोना चक्रवर्ती केवळ तिच्या टॅलेंटवरुन ओळखली जात नाही. ती खऱ्या आयुष्यातही एक ग्लॅमरस मुलगी आहे. तिच्या हॉट आणि फॅब्युलस फोटोंचे सोशल मीडियावर लाखो चाहते आहेत.
3/6

सुमोना चक्रवर्ती तिच्या स्टाईल स्टेटमेंटमुळे चाहत्यांना वेड लावते. तिच्या फॅशन सेन्सची झलक तिच्या या फोटोंमधून स्पष्टपणे दिसते.
4/6

सोशल मीडियावर सुमोना चक्रवर्ती तिच्या फॅशन स्टेटमेंटशिवाय वैयक्तिक गोष्टी आणि लाइफस्टाइलशी संबंधित फोटो पोस्ट करत असते. सुमोनाला नेहमीच जबरदस्त ड्रेसेज आणि अॅक्सेसरीजसह स्पॉट केलंय.
5/6

वयाच्या दहाव्या वर्षी आपल्या अभिनय कारकीर्दीची सुरुवात करणार्या सुमोना चक्रवर्तीने आतापर्यंत अनेक कार्यक्रमांमध्ये उत्तम काम केले आहे. सुमोनाने आपल्या करिअरची सुरूवात आमिर खान आणि मनीषा कोइराला यांचा चित्रपट 'मन'मधून केली होती. तिने आतापर्यंत कसम से, कस्तूरी, नीर भरे तेरे नैना देवी अशा छोट्या पडद्यावरील अनेक महत्त्वपूर्ण मालिकांमध्ये काम केले आहे.
6/6

सुमोना चक्रवर्तीला तिची खरी ओळख कपिल शर्माच्या शोमधून मिळाली. या शोमध्ये काम केल्यानंतर सुमोना घराघरात पोहचली. ही ग्लॅमरस मुलगी आता कोट्यवधी चाहत्यांच्या गळ्यातील ताईत झालीय.
Published at : 07 May 2021 05:48 PM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
नाशिक
राजकारण
क्रिकेट
























