Maharashtra Operation Lotus Special Report : महाराष्ट्रात 'ऑपरेशन लोटस'? महाविकास आघाडीला धास्ती
Maharashtra Operation Lotus Special Report : महाराष्ट्रात 'ऑपरेशन लोटस'? महाविकास आघाडीला धास्ती
ऑपरशेन लोटस... विधानसभेत महायुतीला मिळालेल्या घवघवीत यशानंतर आता राज्यात पुन्हा एकदा ऑपरेशन लोटसची चर्चा सुरु झालीय. महाविकास आघाडीचे काही खासदार भाजपात येऊ शकतात, असे संकेत ज्येष्ठ नेत्यांकडून मिळू लागलेत. केंद्रात मित्रपक्षांच्या आधारे सत्तेत असणाऱ्या भाजपचा, स्कोअर वाढवण्यासाठी ही सगळी तयारी सुरु असल्याचं समजतंय. पाहूया.
आत्ता तुम्ही ऐकलेली तीन नेत्यांची ही तीन विधानं काही सांगू पाहतायत.
भविष्यातल्या राजकीय घडामोडींची चाहूल देऊ पाहतायत.
नव्यानं मिळत असलेल्या या संकेतांची आता जुन्याच नावानं जोरदार चर्चा सुरु झालीय.
ते नाव म्हणजे ऑपरेशन लोटस...
महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत भाजप आणि महायुतीला घवघवीत यश मिळालं.
लोकसभा निवडणुकीनंतर महायुतीत आलेलं निराशेचं मळभ विधानसभा निकालांनी दूर केलं.
आता हेच निकाल लोकसभेतलं संख्याबळाचं मळभही दूर करणार का, याची चर्चा सुरु झालीय.
महाराष्ट्रातले मविआचे काही खासदार भाजपच्या वाटेवर असल्याचे स्पष्ट संकेत पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांकडून मिळू लागलेत.