एक्स्प्लोर
Pushpa 2 Breaks Box Office Records: 'पुष्पा 2'नं बॉलिवूड-साऊथच नाहीतर, 'या' दोन हॉलिवूडपटांनाही चारली धूळ; बॉक्स ऑफिसवर खळबळ
Pushpa 2 Breaks Box Office Records: अल्लू अर्जुननं आमिर खानच्या ऑलटाईम ब्लॉकबस्टर सिनेमापासून प्रभासच्या सुपर-डुपर हिट फिल्मपर्यंत सर्वांना मागे टाकलं आहे.
Pushpa 2 Breaks Box Office Records
1/10

सध्या जर कोणी क्या चल रहा है? असा प्रश्न विचारला, तर कोणीही एका फटक्यात सांगेल, पुष्पा 2 चल रहा है... सगळीकडे फक्त पुष्पा, पुष्पा आणि पुष्पाच... पुष्पाचं जणू चक्रीवादळ आलं आहे.
2/10

'पुष्पा 2 : द रूल' हा चित्रपट तयार करण्यासाठी 500 कोटी रुपये लागले आणि हे भांडवल या चित्रपटानं फक्त आणि फक्त चारच दिवसांत कमावलं आहे. अशातच या चार दिवसांत पुष्पानं सर्वांनाच पाणी पाजलं आहे.
3/10

Sacknilk नुसार, पुष्पा 2 नं भारतात अवघ्या 4 दिवसांत 500 कोटींहून अधिकचा व्यवसाय केला आहे. गेल्या तीन दिवसांत या चित्रपटानं लिओ, पीके, संजू आणि जेलर या चित्रपटांच्या आयुष्यभराच्या कमाईपेक्षा जास्त कमाई केली होती.
4/10

चौथ्या दिवशी पुष्पा 2 नं ज्या चित्रपटांचे रेकॉर्ड तोडले, ते सर्व चित्रपट आतापर्यंतचे ब्लॉकबस्टर मानले जातात. या यादीत दोन हॉलिवूड चित्रपटांचाही समावेश आहे.
5/10

अवतार द वे ऑफ वॉटर: जेम्स कॅमेरूनच्या चित्रपटानं 2022 मध्ये भारतात 391.4 कोटी रुपयांची कमाई केली होती. या चित्रपटाचा विक्रमही मोडला आहे.
6/10

Avengers Endgame: 2019 मध्ये, या Marvel चित्रपटानं भारतात 373.05 कोटी रुपयांची कमाई केली होती, जी आता पुष्पा 2 च्या मागे आहे.
7/10

दंगल: आमिर खानचा ऑल-टाईम ब्लॉकबस्टर चित्रपट 2016 मध्ये रिलीज झाला होता, ज्यानं सकनील्कच्या मते भारतात 387.38 कोटी रुपये कमावले होते. हा चित्रपटही पुष्पा 2 च्या मागे पडला आहे.
8/10

सालार सीझफायर पार्ट 1: 2023 साली रिलीज झालेल्या प्रभासच्या या चित्रपटानं 406.45 कोटींची कमाई केली होती. पुष्पा 2 नं त्याचं लाईफटाईम कलेक्शन देखील पार केलं आहे.
9/10

2.0 : रजनीकांत, अक्षय कुमारच्या या चित्रपटानं 2018 मध्ये 407.05 कोटींची कमाई केली होती. त्याचा विक्रमही चौथ्या दिवशी मोडला आहे.
10/10

बाहुबली: प्रभास आणि एसएस राजामौली यांच्या चित्रपटानं 2015 मध्ये म्हणजेच, 9 वर्षांपूर्वी 421 कोटी रुपयांची कमाई केली होती. आता त्याचं लाइफटाईम कलेक्शन देखील पुष्पा 2 नं मागे टाकले आहे.
Published at : 09 Dec 2024 09:11 AM (IST)
आणखी पाहा























