एक्स्प्लोर
'सिंघम'च्या जलव्यानं हादरलं वर्ल्डवाईल्ड बॉक्स ऑफिस, चित्रपटाची 100 कोटींच्या क्लबमध्ये दिमाखात एन्ट्री
Singham Again Worldwide Collection: अजय देवगणचा 'सिंघम अगेन' थिएटरमध्ये प्रदर्शित झाला आहे. बॉक्स ऑफिसवर शानदार ओपनिंग घेतल्यानंतर हा चित्रपट आता जगभरात 100 कोटींच्या क्लबचा भाग बनला आहे.

Singham Again Worldwide box office Collection
1/9

सिंघम अगेन 1 नोव्हेंबर रोजी जगभरात प्रदर्शित झाला. हा चित्रपट 1900 स्क्रीन्सवर चालू आहे आणि चांगली कमाई करत आहे.
2/9

रोहित शेट्टी दिग्दर्शित सिंघम अगेन हा चित्रपट दिवाळीच्या मुहूर्तावर प्रेक्षकांच्या भेटीला आला. या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळतोय.
3/9

Sacknilk च्या मते, चित्रपटानं पहिल्या दिवशी देशांतर्गत बॉक्स ऑफिसवर 43.5 कोटींची कमाई केली होती. आता दोन दिवसांत या चित्रपटानं जगभरात 100 कोटींचा आकडा पार केला आहे.
4/9

'सिंघम अगेन'नं पहिल्याच दिवशी जगभरातील बॉक्स ऑफिसवर 65 कोटींचा व्यवसाय केला. आता दुसऱ्या दिवशी या चित्रपटानं भारतात किती कमाई केली याचे आकडे समोर आले आहेत.
5/9

सिंघम अगेननं दुसऱ्या दिवशी भारतात 41.5 कोटी रुपयांची कमाई केली आहे. म्हणजेच, या चित्रपटाने जगभरात 100 कोटींच्या क्लबमध्ये प्रवेश केला आहे.
6/9

अजय देवगणच्या 'सिंघम अगेन' या चित्रपटाच्या दुसऱ्या दिवसाचं जगभरातील कलेक्शन अद्याप समोर आलेलं नाही.
7/9

सिंघम अगेनचा सामना बॉक्स ऑफिसवर कार्तिक आर्यनचा चित्रपट भूल भुलैया 3 सोबत आहे. दोन्ही चित्रपटांमध्ये जबरदस्त स्पर्धा रंगली आहे.
8/9

सिंघम अगेनचं दिग्दर्शन रोहित शेट्टीनं केलं आहे. दिग्दर्शकाचा कॉप युनिव्हर्सचा हा पाचवा चित्रपट आहे.
9/9

या चित्रपटात अजय देवगण मुख्य भूमिकेत आहे. याशिवाय करीना कपूर, रणवीर सिंह, दीपिका पदुकोण, टायगर श्रॉफ, जॅकी श्रॉफ, अर्जुन कपूर आणि अक्षय कुमार हे देखील चित्रपटाचा भाग आहेत.
Published at : 04 Nov 2024 07:36 AM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
राजकारण
मुंबई
बातम्या
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
