एक्स्प्लोर
In Pics: दिवाळीतला Priyanka Chopra चा देसी लूक सोशल मीडियावर व्हायरल
(Photo:@priyankachopra/IG)
1/6

प्रियंका चोप्रा तिच्या पतीसोबत लॉस एंजेलिसमध्ये राहते. विदेशात राहत असूनदेखील तिने भारतीय संस्कृती, परंपरांचा विसर पडू दिलेला नाही. प्रियंका विदेशात राहत असली तरी मनाने ती भारतीय आहे.(Photo:@priyankachopra/IG)
2/6

प्रियंका चोप्रा सर्व सण धुमधडाक्यात साजरे करत असते. तिचा नवरा निक जोनासदेखील तिला साथ देत असतो. यंदाची दिवाळीदेखील प्रियंका चोप्रा तिच्या पतीसोबत लॉस एंजेलिसमध्येच साजरी करत आहे. नुकतेच प्रियंकाने देसी लूकमधील फोटो तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केले आहेत.(Photo:@priyankachopra/IG)
3/6

प्रियंका चोप्राने ऑफ व्हाइट रंगाचा फ्लोरल प्रिंट असलेला लहेंगा घातला आहे. त्यात ती खूप सुंदर दिसून येत आहे. (Photo:@priyankachopra/IG)
4/6

प्रियंकाने तिचा लूक आणखी खुलवण्यासाठी क्लासी दागिने घातले आहेत. यात मोकळ्या केसांमुळे ती अजूनच उठून दिसत आहे.(Photo:@priyankachopra/IG)
5/6

प्रियंकाने फोटो शेअर करत चाहत्यांना दीपावलीच्या शुभेच्छादेखील दिल्या आहेत. (Photo:@priyankachopra/IG)
6/6

प्रियंकाने तिच्या फोटोंतून चाहत्यांना घायाळ केलेच आहे. पण निक जोनासदेखील प्रियंकाच्या फोटोवर कमेंट्स करण्यापासून स्वत:ला रोखू शकला नाही.(Photo:@priyankachopra/IG)
Published at : 04 Nov 2021 07:59 PM (IST)
View More
Advertisement
Advertisement


















