एक्स्प्लोर

बिहार निवडणूक निकाल 2025

(Source:  ECI | ABP NEWS)

कोण आहे ते कॉन्ट्रॅक्टर, उभं करा त्याला ? मुख्यमंत्र्यांकडून ठेकेदारांची खरडपट्टी, व्हिडिओ व्हायरल

कोण आहेत ते कॉन्ट्रॅक्टर, कोण त्याला उभं करा? का उशीर झाला ते सांगा आणि आता काय करणार आहात ते सांगा? असे फडणवीस यांनी म्हटले.

मुंबई : राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी राज्यातील पायाभूत सुविधांच्या अनुषंगाने, राज्यात सुरू असलेल्या प्रकल्पांच्या अनुषंगाने आढावा बैठक (Mumbai) घेतली. या बैठकीत त्यांनी ठेकेदारांवर संताप व्यक्त केला, काँट्रॅक्टरांची चांगलीच खरडपट्टी केल्याचं दिसून आलं. राज्यातील प्रकल्प वेळेत पूर्ण झाले पाहिजे असे म्हणत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे काल झालेल्या बैठकीत अधिकारी आणि कंत्राटदारांवर चांगलेच संतापल्याचं दिसून आलं. पाच वर्षांची वेळ मागू नका, अडीच वर्षांत प्रकल्प पूर्ण करा, जगात इतक्या धिम्या गतीने कुठेच काम होत नाही. पायाभूत सुविधांसंदर्भातील वॉररुम बैठकीत मुख्यमंत्र्‍यांचा हा रुद्रावतार दिसून आला.

कोण आहेत ते कॉन्ट्रॅक्टर, कोण त्याला उभं करा? का उशीर झाला ते सांगा आणि आता काय करणार आहात ते सांगा? असे फडणवीस यांनी म्हटले. तसेच, बहोत स्लो काम चला रहा है, एैसा नही चलेगा. आयएम नॉट हॅप्पी विथ दीस, या स्पीडने मी हॅप्पी नाहीये, असेही मुख्यमंत्र्‍यांनी म्हटले. या बैठकीत मुख्यमंत्र्‍यांनी एकेक प्रकल्पाचा बारकाईने आढावा घेतला असून प्रत्येक प्रकल्पाची डेडलाईन ठरवूनच काम करा, पायाभूत सुविधा वॉररुमने सुद्धा दर तीन महिन्याने प्रत्येक प्रकल्पाचा आढावा घ्यावा, अशा सूचनाही अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.

5 ते 10 वर्षे प्रकल्प चालतात हे आम्हाला मान्य नाही

राज्यातील आणि एमएमआरडीच्या 21 प्रकल्पांसाठी आपण कम्प्लिशनची जी नियोजित तारीख दिलेली आहे, त्यातील जे प्रकल्प मागे पडले आहेत त्याच्या कंत्राटदारांनाही आपण बोलवलं होत. त्यावेळी, कंत्राटदारांनीही काही अडचणी मांडल्या आहेत, अधिकाऱ्यांना सांगून त्या अडचणी सोडवायला आपण सांगितलं आहे. 5 ते 10 वर्ष प्रोजेक्ट्स चालतात ते आम्हाला मान्य नाही, प्रोजेक्ट्स वेळेत पूर्ण झाले पाहिजेत असे म्हणत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठेकेदारांच्या कामकाजावर संताप व्यक्त केला आहे.

दरम्यान, पायाभूत सुविधांच्या कामावर राज्यातील फडणवीस आणि केंद्रातील मोदी सरकारचा कायम भर राहिला आहे. मुंबईतील विविध प्रकल्प असोत किंवा देशभरातील रस्ते, विकासाचे प्रकल्प असो भाजप सरकारने वेगाने हे प्रकल्प पूर्णत्वास नेण्यासाठी प्रयत्न केल्याचं दिसून आलं आहे. विशेष म्हणजे मुंबईतील अटल सेतू असेल, कोस्टल रोड असेल, नवी मुंबई विमानतळ असेल किंवा मुंबईतील मेट्रो प्रकल्प असतील गतीमानतेनं हे प्रकल्प सुरू करण्यासाठी सरकार प्रयत्नशील असल्याचं दिसून आलं आहे. 

हेही वाचा

Video: तळपायाची आग मस्तकात गेली; निवडणूक आयुक्तांचा व्हिडिओ पाहून संतापले राज ठाकरे, महाराष्ट्राला आवाहन

महेश गलांडे एबीपी माझा डिजिटलमध्ये डेप्युटी प्रोड्यूसर म्हणून कार्यरत आहेत. पत्रकारितेत एकूण 13 वर्षे आणि डिजिटल पत्रकारितेत 11 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव त्यांच्या पाठिशी आहे. यापूर्वी ईटीव्ही मराठी, लोकमत या माध्यम संस्थांमध्ये त्यांनी काम पाहिलं असून राजकीय लेखन, सामाजिक विषयाची जाण व भान आहे. 
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Tejashwi Yadav : हारता हारता जिंकले! तेजस्वी यादवांनी राघोपूरचा गढ राखला, भाजपचा 14 हजार मतांनी पराभव
हारता हारता जिंकले! तेजस्वी यादवांनी राघोपूरचा गढ राखला, भाजपचा 14 हजार मतांनी पराभव
Bihar Results 2025 : यादवांची नाराजी, मुस्लिमांनी साथ सोडली; तेजस्वी यादवांच्या पक्षाच्या पराभवाची 5 मोठी कारणे
यादवांची नाराजी, मुस्लिमांनी साथ सोडली; तेजस्वी यादवांच्या पक्षाच्या पराभवाची 5 मोठी कारणे
Alinagar Election Result Updates: अलीनगरमधून मैथिली ठाकूर 11 हजार मतांनी विजयी, RJD च्या विनोद मिश्रांचा पराभव
अलीनगरमधून मैथिली ठाकूर 11 हजार मतांनी विजयी, RJD च्या विनोद मिश्रांचा पराभव
राजेंविरुद्ध शड्डू, अभिजीत बिचुकलेंचा नगराध्यक्षपदासाठी अर्ज; म्हणाले, साताऱ्याचा 'सितारा' करतो
राजेंविरुद्ध शड्डू, अभिजीत बिचुकलेंचा नगराध्यक्षपदासाठी अर्ज; म्हणाले, साताऱ्याचा 'सितारा' करतो
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Eknath Shinde on Bihar Result : बिहारच्या जनतेने जंगलराज नाकारुन विकास राज स्वीकारलं
Delhi BJP Celebration : NDA ला बिहारमध्ये ऐतिहासिक विजय, दिल्लीत जोरदार सेलिब्रेशन
PM Modi Full Speech Bihar Result : युवकांनी बिहारमधील जंगलराज संपवलं, विजयानंतरचं मोदींचं पहिलं भाषण
J. P. Nadda Delhi Speech मोदींची हॅट्रीक,बिहारच्या विजयानंतर जे. पी नड्डा यांचं भाजप मुख्यालयात भाषण
PM Modi On Bihar Result : NDA च्या विजयाने MY म्हणजे महिला आणि युवा हा नवा फॉर्म्युला बनला - मोदी

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Tejashwi Yadav : हारता हारता जिंकले! तेजस्वी यादवांनी राघोपूरचा गढ राखला, भाजपचा 14 हजार मतांनी पराभव
हारता हारता जिंकले! तेजस्वी यादवांनी राघोपूरचा गढ राखला, भाजपचा 14 हजार मतांनी पराभव
Bihar Results 2025 : यादवांची नाराजी, मुस्लिमांनी साथ सोडली; तेजस्वी यादवांच्या पक्षाच्या पराभवाची 5 मोठी कारणे
यादवांची नाराजी, मुस्लिमांनी साथ सोडली; तेजस्वी यादवांच्या पक्षाच्या पराभवाची 5 मोठी कारणे
Alinagar Election Result Updates: अलीनगरमधून मैथिली ठाकूर 11 हजार मतांनी विजयी, RJD च्या विनोद मिश्रांचा पराभव
अलीनगरमधून मैथिली ठाकूर 11 हजार मतांनी विजयी, RJD च्या विनोद मिश्रांचा पराभव
राजेंविरुद्ध शड्डू, अभिजीत बिचुकलेंचा नगराध्यक्षपदासाठी अर्ज; म्हणाले, साताऱ्याचा 'सितारा' करतो
राजेंविरुद्ध शड्डू, अभिजीत बिचुकलेंचा नगराध्यक्षपदासाठी अर्ज; म्हणाले, साताऱ्याचा 'सितारा' करतो
नितीश कुमारांच्या नेतृत्वातच आम्ही निवडणूक लढवल्या पण..; बिहारच्या मुख्यमंत्रीपदाबाबत फडणवीस स्पष्टच बोलले
नितीश कुमारांच्या नेतृत्वातच आम्ही निवडणूक लढवल्या पण..; बिहारच्या मुख्यमंत्रीपदाबाबत फडणवीस स्पष्टच बोलले
एकीकडे बिहारमध्ये भाजप युतीचा मोठा विजय, मुख्यमंत्री फडणवीस दिल्लीत; महाराष्ट्राला मिळणार 2655 कोटी
एकीकडे बिहारमध्ये भाजप युतीचा मोठा विजय, मुख्यमंत्री फडणवीस दिल्लीत; महाराष्ट्राला मिळणार 2655 कोटी
MIM Bihar MLA List : गेल्यावेळी आमदारांनी अर्ध्यात साथ सोडली, ओवेसींनी बिहारमध्ये पुन्हा ताकद लावली, एमआयएमचे नव्या विधानसभेत किती आमदार?
गेल्यावेळी आमदारांनी अर्ध्यात साथ सोडली, ओवेसींनी बिहारमध्ये पुन्हा ताकद लावली, एमआयएमचे नव्या विधानसभेत किती आमदार?
Vaibhav Suryavanshi : रायझिंग स्टार टी 20 चषकात वैभव सूर्यवंशीचं वादळ, अवघ्या 42 चेंडूत 144 धावा, 11 चौकार आणि 15 षटकारांचा पाऊस
Vaibhav Suryavanshi : रायझिंग स्टार टी 20 चषकात वैभव सूर्यवंशीचं वादळ, अवघ्या 42 चेंडूत 144 धावा, 11 चौकार आणि 15 षटकारांचा पाऊस
Embed widget