एक्स्प्लोर

Video: तळपायाची आग मस्तकात गेली; निवडणूक आयुक्तांचा व्हिडिओ पाहून संतापले राज ठाकरे, महाराष्ट्राला आवाहन

निवडणुका आयोगाच्या आजच्या पत्रकार परिषदेची ही क्लिप मला कोणीतरी पाठवली. ती पाहून तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता 100% खात्री पटली की निवडणूक आयोग स्वायत्त आहे,

मुंबई : राज्य निवडणूक आयोगाने (Election commission) आज पत्रकार परिषद घेत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची (Election) घोषणा केली, त्यानुसार राज्यात 2 डिसेंबर रोजी मतदान होणार असून 3 डिसेंबर रोजी निकाल जाहीर होणार आहे. त्यामुळे, पुढील महिनाभरातच राजकीय पक्ष आणि उमेदवारांना सर्व रणनीती आखावी लागेल. याचदरम्यान, निवडणूक आयोगाच्या पत्रकार परिषदेत पत्रकारांनी दुबार मतदान नोंदणी आणि मतदार यादीसंदर्भाने आयुक्तांना प्रश्न विचारले. मात्र, पत्रकारांच्या प्रश्नावर समाधानकारक उत्तर आयुक्त वाघमारे यांना देता आले नाही. मनसेप्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांनीही याच पत्रकार परिषदेतील एक व्हिडिओ शेअर करत तीव्र संताप व्यक्त केला आहे.

निवडणुका आयोगाच्या आजच्या पत्रकार परिषदेची ही क्लिप मला कोणीतरी पाठवली. ती पाहून तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता 100% खात्री पटली की निवडणूक आयोग स्वायत्त आहे, हे फक्त संविधानात, अशा शब्दात मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी निवडणूक आयुक्तांच्या उत्तरावरुन संताप व्यक्त केला आहे. निवडणूक आयोग हे सत्ताधाऱ्यांच्या हातचं बाहुलं आहे, दुबार मतदार नोंदणीपासून, ते मतदार यादीतील अनेक घोळ या सगळ्यावर एकही प्रश्न विचारल्यावर जर निवडणूक आयोगाला एकही उत्तर देता येत नसेल किंवा द्यायची इच्छा नसेल तर तुमचा उपयोग काय? जबाबदारी तर तुम्ही केंव्हाच झटकली आहेत, आत्ता उत्तरदायित्व पण नाकारणार, मग तुमच्या पदांच करायचं काय? महाराष्ट्रातील जनतेने ही क्लिप जरहावी, तुमच्या मतदानाचा ढळढळीत अपमानाचा उगम कुठून आहे हे तुम्हाला कळेल, असेही राज ठाकरे यांनी म्हटलं. तसेच, या पत्रकार परिषदेत प्रश्न विचारून निवडणूक आयोगाची भंबेरी उडवणाऱ्या पत्रकारांचं त्यांनी अभिनंदन केलंय.

राज ठाकरेंचा प्रश्न, निवडणूक आयुक्तांचे उत्तर

दरम्यान, राज ठाकरेंनी आपल्या भाषणातून उपस्थित केलेला, सुलभ शौचालयाच्या पत्त्यावर किंवा आयुक्तांच्या बंगल्याच्या पत्त्यावर शेकडो मतदारांची नावं नोंदवण्यात आली आहेत. त्याला जबाबदार कोण? असा प्रश्न निवडणूक आयुक्तांना विचारण्यात आला होता. त्यावर, आयुक्तांना समाधानकारक उत्तर देता आलं नाही. निवडणूक आयोगाचे अध्यक्ष दिनेश वाघमारे म्हणाले की, "मतदार यादी तयार करण्याची यंत्रणा ही वेगळी आहे. आम्ही फक्त ती यादी वापरतो. एक तारीख ठरवतो आणि त्या दिवसाची यादी मतदानाला ग्राह्य धरतो. त्याची शहानिशाही आम्हीच करतो. दुबार मतदार असतील किंवा चुकीच्या प्रभागात नाव गेलं असल्यास ते तपासतो. ज्यांची नावे ही आधीच्या विधानसभा निवडणुकीमध्ये होती, पण आताच्या यादीत नसतील तर त्या नावांचा समावेश करतो. काही लहान-सहान दोष असतील तर ते दुरुस्त करतो."

आम्ही कठोर भूमिका घेऊ - संदीप देशपांडे

ज्या पद्धतीने आज निवडणूक आयोगाने डाव साधला, तो अंत्यत चुकीचा आहे. कोणाचा दबाव आहे तुम्हाला, तुम्ही दुबार मतदार कसा थांबवणार आहात. हे लोकशाहीला घातक आहे. निवडणूक पारदर्शक होणार कशी? बोगस मतदार यादीबाबत तुम्ही काय करता? असे सवाल मनसेच सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी आयोगाला विचारले आहेत. तसेच, जिथे निवडणुकीत बोगस मतदार दिसतील तिथे आम्ही कठोर भूमिका घेऊ, असेही त्यांनी म्हटले.

रोहित पवारांनी व्यक्त केला संताप, विचारले प्रश्न

निवडणूक आयुक्तांनी विधानसभेच्या दुबार मतदारांवर बोलताना संगितले की “मी लोकसभा, विधानसभेच्या दुबार मतदारांबाबत कमेंट करणार नाही ?”. निवडणूक आयुक्तच कमेंट करणार नसतील तर मग तत्कालीन अतिरिक्त निवडणूक अधिकारी किरण कुलकर्णी तरी विधानसभेतील दुबार मतदारांवर कमेंट करतील का? असा सवाल आमदार रोहित पवार यांनी विचारला आहे. तसेच, आयुक्तांनी कमेंट करण्यास नकार दिला असला तरी त्यांनी किमान आम्ही इतके दिवस पुरव्यासकट दुबार मतदारांचा जो विषय लावून धरला तो मान्य तरी केला त्याबद्दल त्यांचे आभार, असा खोचक टोलाही आमदार पवार यांनी लगावला आहे.

हेही वाचा

राज्यातील नगरपालिका, नगरपरिषद निवडणुकांच्या तारखा जाहीर; निवडणूक आयोगाचे 10 महत्त्वाचे मुद्दे

एबीपी माझा वृत्तवाहिनीमध्ये मागील 7 वर्षांपासून कार्यरत
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Govinda Discharged : 'हिरो नंबर वन'ला रुग्णालयातून डिस्चार्ज, कमी काम आणि जास्त योग हे सूत्र पाळण्याचा गोविंदाचा संकल्प
'हिरो नंबर वन'ला रुग्णालयातून डिस्चार्ज, कमी काम आणि जास्त योग हे सूत्र पाळण्याचा गोविंदाचा संकल्प
मुंबई इंडियन्स अर्जुन तेंडुलकरला सोडणार, लखनौचा हा खेळाडू मुंबईत येणार? IPL लिलावापूर्वीच डील
मुंबई इंडियन्स अर्जुन तेंडुलकरला सोडणार, लखनौचा हा खेळाडू मुंबईत येणार? IPL लिलावापूर्वीच डील
दिल्लीतील भीषण स्फोटाचा निषेध, केंद्रीय कॅबिनेटमध्ये ठराव संमत; कट रचणाऱ्यांना शोधण्याचा निर्धार
दिल्लीतील भीषण स्फोटाचा निषेध, केंद्रीय कॅबिनेटमध्ये ठराव संमत; कट रचणाऱ्यांना शोधण्याचा निर्धार
Rashid Khan 2nd Marriage राशिद खानसोबतची 'ती' गोरी गोरी पान सुंदरी कोण? व्हायरल फोटो कुठला, क्रिकेटरने लग्नाचंही स्पष्टच सांगितलं
राशिद खानसोबतची 'ती' गोरी गोरी पान सुंदरी कोण? व्हायरल फोटो कुठला, क्रिकेटरने लग्नाचंही स्पष्टच सांगितलं
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Pawar Politics: शरद पवारांसोबत युतीवर Ajit Pawar यांचे मोठे वक्तव्य, म्हणाले 'चाचपणी करून निर्णय घेऊ'
Delhi Terror Attack: दिल्लीतील स्फोट दहशतवादी हल्लाच, केंद्रीय मंत्री Ashwini Vaishnaw यांची घोषणा
Zero Hour Sarita Kaushik : स्थानिक स्वराज्य संस्थांमधील मतदानाची घसरणारी आकडेवारी चिंताजनक
Maharashtra Politics: स्थानिक निवडणुकींसाठी अजित पवार-शरद पवार एकत्र येणार? सुप्रिया सुळेंच्या प्रस्तावावर खलबतं
Zero Hour Amit Gorkhe : पिंपरी-चिंचवडमध्ये काका-पुतणे एकत्र? भाजप म्हणते, 'फरक पडणार नाही'

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Govinda Discharged : 'हिरो नंबर वन'ला रुग्णालयातून डिस्चार्ज, कमी काम आणि जास्त योग हे सूत्र पाळण्याचा गोविंदाचा संकल्प
'हिरो नंबर वन'ला रुग्णालयातून डिस्चार्ज, कमी काम आणि जास्त योग हे सूत्र पाळण्याचा गोविंदाचा संकल्प
मुंबई इंडियन्स अर्जुन तेंडुलकरला सोडणार, लखनौचा हा खेळाडू मुंबईत येणार? IPL लिलावापूर्वीच डील
मुंबई इंडियन्स अर्जुन तेंडुलकरला सोडणार, लखनौचा हा खेळाडू मुंबईत येणार? IPL लिलावापूर्वीच डील
दिल्लीतील भीषण स्फोटाचा निषेध, केंद्रीय कॅबिनेटमध्ये ठराव संमत; कट रचणाऱ्यांना शोधण्याचा निर्धार
दिल्लीतील भीषण स्फोटाचा निषेध, केंद्रीय कॅबिनेटमध्ये ठराव संमत; कट रचणाऱ्यांना शोधण्याचा निर्धार
Rashid Khan 2nd Marriage राशिद खानसोबतची 'ती' गोरी गोरी पान सुंदरी कोण? व्हायरल फोटो कुठला, क्रिकेटरने लग्नाचंही स्पष्टच सांगितलं
राशिद खानसोबतची 'ती' गोरी गोरी पान सुंदरी कोण? व्हायरल फोटो कुठला, क्रिकेटरने लग्नाचंही स्पष्टच सांगितलं
लाडकी बहीण योजनेच्या वेबसाईटमध्ये बदल; 'त्या' महिलांसाठी बदल केल्याची मंत्री आदिती तटकरेंची माहिती
लाडकी बहीण योजनेच्या वेबसाईटमध्ये बदल; 'त्या' महिलांसाठी बदल केल्याची मंत्री आदिती तटकरेंची माहिती
व्हाईट कॉलर दहशतवादी मॉड्यूल; एक डझन अटकेत अन् त्यामधील अर्धा डझन पेशाने चाळीशीच्या उंबरठ्यावरील डॉक्टर निघाले! 37 दिवसांपूर्वी लग्नात प्रोफेसर शाहीन भेटली अन्..
व्हाईट कॉलर दहशतवादी मॉड्यूल; एक डझन अटकेत अन् त्यामधील अर्धा डझन पेशाने चाळीशीच्या उंबरठ्यावरील डॉक्टर निघाले! 37 दिवसांपूर्वी लग्नात प्रोफेसर शाहीन भेटली अन्..
Eknath Shinde: फुकटचा ताठा अन् नाव उबाठा, एकनाथ शिंदेंची बोचरी टीका; म्हणाले, एक बिस्किटचा पुडाही दिला नाही
फुकटचा ताठा अन् नाव उबाठा, एकनाथ शिंदेंची बोचरी टीका; म्हणाले, एक बिस्किटचा पुडाही दिला नाही
ह्रदयद्रावक... नाशिकवरुन मुंबईत फिरायला आला, उंच इमारतीवरुन सळई कोसळल्याने युवकाचा मृत्यू झाला
ह्रदयद्रावक... नाशिकवरुन मुंबईत फिरायला आला, उंच इमारतीवरुन सळई कोसळल्याने युवकाचा मृत्यू झाला
Embed widget