Maharashtra Elections : दुबार मतदार कसं रोखणार? निवडणूक आयोगाने 'डबर स्टार चिन्हा'ची स्ट्रॅटेजी सांगितली
Maharashtra Elections Timetable: ज्या मतदारांचे नाव दोन ठिकाणी आहे त्यांच्या नावापुढे डबल स्टार चिन्हांकित करण्यात येणार आहे. त्यानुसार मतदानाच्या आधी दोन दिवस त्यांची निश्चित संख्या स्पष्ट होणार आहे.

मुंबई : राज्यातील नगरपालिका आणि नगरपंचायतींसाठी मदतानाची तारीख जाहीर (Maharashtra Elections Date) करण्यात आली आहे. त्यानुसार 2 डिसेंबर रोजी मतदान घेण्यात येणार असून 3 डिसेंबर रोजी मतमोजणी होणार आहे. यासाठी सर्व तयारी झाल्याची माहिती निवडणूक आयोगाने दिली. विरोधकांनी केलेल्या दुबार मतदानावरही निवडणूक आयोगाने स्पष्टीकरण दिलं. अशा प्रकारचं संभाव्य दुबार मतदार रोखण्यासाठी निवडणूक आयोगाने डबल स्टारची स्ट्रॅटेजी आखण्यात आल्याची माहिती आयोगाने दिली.
Maharashtra Double Voter Strategy : नेमकं कसं रोखणार दुबार मतदान?
मतदारयादीत दोनदा नाव असलेली नावे डबल स्टारने चिन्हांकित करण्यात आलेली आहेत. त्यानुसार डबल स्टार असणाऱ्या मतदारास अन्यत्र मतदान करणार नसल्याची हमी द्यावी लागणार आहे. डबल स्टार असणाऱ्या मतदारास बोटाला शाई लावलेली असल्याने अन्यत्र मतदान करता येणार नाही. तसेच मतदानाच्या दोन दिवस आधी दुबार मतदारांची निश्चित संख्या स्पष्ट होईल अशी माहिती निवडणूक आयोगाने दिली आहे.
ज्या मतदाराच्या नावापुढे डबल स्टार असेल तो कोणत्या केंद्रावर मतदान करणार आहे याची माहिती द्यावी लागणार आहे. त्यानुसार त्याने मतदान केल्यानंतर तशी माहिती दुसऱ्या केंद्रावर देण्यात येणार असल्याचं निवडणूक आयोगाने म्हटलं आहे.
Nagarpalika Election Dates : निवडणुकीच्या तारखा जाहीर
राज्यातील 246 नगरपालिका आणि 42 नगरपंचायतींच्या निवडणुकांच्या तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत. त्यानुसार 2 डिसेंबर रोजी मतदान होणार असून 3 डिसेंबर रोजी निकाल लागणार आहे.
Maharashtra Elections Timetable : असे असेल निवडणुकीचे टाईमटेबल
नामनिर्देशन पत्र - 10 नोव्हेंबर
अंतिम मुदत - 17 नोव्हेंबर
छाननी - 18 नोव्हेंबर
अर्ज माघारी घेण्याची तारीख - 21 नोव्हेंबर
निवडणूक चिन्ह वाटप - 26 नोव्हेेबर
मतदान - 2 डिसेंबर
निकाल - 3 डिसेंबर
3 डिसेंबरला निकाल
Maharashtra Total Voter : एकूण किती मतदार?
एकूण मतदार - 1 कोटी 7 लाख 3 हजार 576
महिला मतदार - 53 लाख 22 हजार 870
नगरपालिका उमेदवारांसाठी खर्च मर्यादा किती?
अ वर्ग
अध्यक्षपद - 15 लाख
नगरसेवक - 5 लाख
ब वर्ग
अध्यक्षपद - 11 लाख 25 हजार
नगरसेवक - 3 लाख 50 हजार
क वर्ग
अध्यक्षपद - 7 लाख 50 हजार
नगरसेवक - 2 लाख 50 हजार
नगरपंचायत उमेदवारांसाठी खर्च मर्यादा किती?
अध्यक्षपद - 6 लाख
नगरसेवक - 2 लाख 25 हजार
विभागनिहाय नगरपरिषद-नगरपंचायती निवडणूक
कोकण - 17
नाशिक -49
पुणे -60
संभाजीनगर -52
अमरावती -45
नागपूर -55
ही बातमी वाचा:















