एक्स्प्लोर

Chhattisgarh Train Accident : छत्तीसगडमध्ये पॅसेंजर- मालगाडीची समोरासमोर धडक, सहा प्रवाशी ठार, रेल्वेचे अनेक डबे रुळावरून खाली

Bilaspur Train Accident : हावडा रुटवर जाणाऱ्या पॅसेंजर आणि मालगाडीची समोरासमोर धडक झाल्याने सहा जणांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.

Chhattisgarh Train Accident : छत्तीसगडमधील बिलासपूर (Bilaspur) येथे लालखदान (Lalkhadan Train Accident) रेल्वे स्थानकाजवळ मोठा रेल्वे अपघात घडला आहे. हावड़ा (Howrah) रूटवर चालणारी पॅसेंजर ट्रेन आणि मालगाडीची समोरासमोर धडक झाली. त्यामध्ये आतापर्यंत सहा जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे, तर अनेकजण जखमी आहेत. जखमींवर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरू असून मृतांच्या आकडेवारीत वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

रेल्वे प्रशासनाने त्वरित रेस्क्यू टीम (rescue team) आणि मेडिकल युनिट (medical unit) घटनास्थळी पाठवले आहे. स्थानिक प्रशासनही मदतीसाठी पोहोचले आहे. या अपघातामुळे संपूर्ण रूटवरील अनेक ट्रेन रद्द करण्यात आल्या असून काहींना पर्यायी मार्गान वळवण्यात आलं आहे.

Bilaspur Train Accident : समोरासमोर धडक

कोरबा (Korba Passenger Train) पॅसेंजर ट्रेन आणि मालगाडीमध्ये जोरदार धडक झाली. या अपघातात आतापर्यंत 6 प्रवाशांच्या मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे. तसेच 12 पेक्षा जास्त प्रवासी जखमी (injured) झाले आहेत. या ठिकाणी बचाव कार्य सुरू असून लोकांचीही मोठी गर्दी जमली आहे.

Injured Admitted to Hospital : जखमींना रुग्णालयात दाखल

जखमी प्रवाशांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. अपघात इतका जबरदस्त होता की पॅसेंजर ट्रेन मालगाडीवर चढली होती. घटनास्थळी प्रवाशांच्या किंचाळ्या आणि आरडाओरडामुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले.

Railway Accident : रेल्वे प्रशासन आणि स्थानिक मदत

रेल्वे प्रशासन आणि स्थानिक प्रशासन यांनी बचाव कार्य (relief operation) त्वरित सुरु केले. अपघातामुळे अनेक ट्रेन पर्यायी मार्गावर पाठवण्यात आल्या आहेत. अपघाताचे कारण अद्याप अज्ञात असून, रेल्वे तपासणी सुरु आहे.

राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते भूपेश बघेल (Bhupesh Baghel) यांनी या अपघाताबद्दल दु:ख व्यक्त केले आहे. तसेच या अपघातासाठी कारणीभूत असलेल्यांवर कारवाई करण्याचा इशाराही दिला.

ही बातमी वाचा:

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

धनंजय देशमुखांना 20 कोटींची ऑफर; दादा गरुडचा कथित व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल, धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराडच्या मुलाच्या माध्यमातून ऑफरचा दावा
धनंजय देशमुखांना 20 कोटींची ऑफर; दादा गरुडचा कथित व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल, धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराडच्या मुलाच्या माध्यमातून ऑफरचा दावा
कोल्हापूरकरांचा अनोखा निषेध; कचऱ्याचीच निघाली प्रतीकात्मक अंत्ययात्रा
कोल्हापूरकरांचा अनोखा निषेध; कचऱ्याचीच निघाली प्रतीकात्मक अंत्ययात्रा
सुनील तटकरेंना लोकसभेला केलेली मदत सर्वात मोठी चूक, कोलाड नाक्यावरील 70 हजार कोटींचा भ्रष्टाचार देखील पाहिला; शिंदे गटाचे आमदार महेंद्र दळवींचा हल्लाबोल
सुनील तटकरेंना लोकसभेला केलेली मदत सर्वात मोठी चूक, कोलाड नाक्यावरील 70 हजार कोटींचा भ्रष्टाचार देखील पाहिला; शिंदे गटाचे आमदार महेंद्र दळवींचा हल्लाबोल
Baba Siddique Murder Case Update: बाबा सिद्दिकींची हत्या, सलमान खानच्या घरावरील हल्ल्याचा मास्टरमाईंड सापडला? अनमोल बिश्नोई कॅनडातून अटकेत?
बाबा सिद्दिकींची हत्या, सलमान खानच्या घरावरील हल्ल्याचा मास्टरमाईंड सापडला?
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Soyabeen High Rate: सोयाबीनला विक्रमी भाव, वाशिम बाजार समितीत शेतकऱ्यांची गर्दी
Anmol Bishnoi Detained: सलमान खानच्या घरावर हल्ला, बाबा सिद्दीकी हत्येचा मास्टरमाईंड कॅनडात अटकेत?
Local Body Polls: महायुतीत ठिणगी! Nitesh Rane स्वबळावर लढण्याच्या तयारीत, Nashik मध्ये MVA-MNS एकत्र येणार?
Local Body Election : राज्यात 246 नगरपरिषदा, 42 नगरपंचायतींसाठी रणधुमाळी, Mahayuti-MVA मध्ये आघाडीचं काय?
Local Body Election 2025 :२८८ पालिका-पंचायतींसाठी अर्ज दाखल, पण महायुती की मविया? राजकीय संभ्रम कायम

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
धनंजय देशमुखांना 20 कोटींची ऑफर; दादा गरुडचा कथित व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल, धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराडच्या मुलाच्या माध्यमातून ऑफरचा दावा
धनंजय देशमुखांना 20 कोटींची ऑफर; दादा गरुडचा कथित व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल, धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराडच्या मुलाच्या माध्यमातून ऑफरचा दावा
कोल्हापूरकरांचा अनोखा निषेध; कचऱ्याचीच निघाली प्रतीकात्मक अंत्ययात्रा
कोल्हापूरकरांचा अनोखा निषेध; कचऱ्याचीच निघाली प्रतीकात्मक अंत्ययात्रा
सुनील तटकरेंना लोकसभेला केलेली मदत सर्वात मोठी चूक, कोलाड नाक्यावरील 70 हजार कोटींचा भ्रष्टाचार देखील पाहिला; शिंदे गटाचे आमदार महेंद्र दळवींचा हल्लाबोल
सुनील तटकरेंना लोकसभेला केलेली मदत सर्वात मोठी चूक, कोलाड नाक्यावरील 70 हजार कोटींचा भ्रष्टाचार देखील पाहिला; शिंदे गटाचे आमदार महेंद्र दळवींचा हल्लाबोल
Baba Siddique Murder Case Update: बाबा सिद्दिकींची हत्या, सलमान खानच्या घरावरील हल्ल्याचा मास्टरमाईंड सापडला? अनमोल बिश्नोई कॅनडातून अटकेत?
बाबा सिद्दिकींची हत्या, सलमान खानच्या घरावरील हल्ल्याचा मास्टरमाईंड सापडला?
Raj Thackeray On BMC Election 2025: 227 पैकी 125 जागांवर मनसेची ताकद, मेरीटनूसार जागावाटप; मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी राज ठाकरेंची जोरदार तयारी
227 पैकी 125 जागांवर मनसेची ताकद, मेरीटनूसार जागावाटप; BMC च्या निवडणुकीसाठी राज ठाकरेंची जोरदार तयारी
Khed Nagarparishad Election 2025: भाजपमध्ये येताच वैभव खेडेकरांनी डाव टाकला, खेडच्या नगराध्यक्षपदासाठी पत्नीचं ब्रँडिंग, कदम पितापुत्र अन् शिंदे गट चवताळणार?
भाजपमध्ये येताच वैभव खेडेकरांनी डाव टाकला, खेडच्या नगराध्यक्षपदासाठी पत्नीचं ब्रँडिंग, कदम पितापुत्र अन् शिंदे गट चवताळणार?
Suraj Chavan Wedding: अरेंज वैगरे न्हाय, भावाचं लव्ह मॅरेज हाय; गुलिगत स्टार सूरज चव्हाण मामाच्या मुलीसोबत बोहल्यावर चढणार
अरेंज न्हाय, भावाचं लव्ह मॅरेज हाय; गुलिगत स्टार सूरज चव्हाण मामाच्या मुलीशीच बांधतोय लग्नगाठ
Abdul Sattar: आमदार निधीतून स्वत:च्याच शिक्षण संस्थेला 32 लाखांच्या रुग्णवाहिका दिल्या, अब्दुल सत्तार अडचणीत, न्यायालयाकडून महत्त्वाचे निर्देश
आमदार निधीतून स्वत:च्याच शिक्षण संस्थेला 32 लाखांच्या रुग्णवाहिका दिल्या, अब्दुल सत्तार अडचणीत, न्यायालयाकडून महत्त्वाचे निर्देश
Embed widget