एक्स्प्लोर
आधी महादेवाचा भक्त, अभिनेत्याने लग्नासाठी स्वीकारला इस्लाम, पूजा-पाठ करणारा आता 5 वेळा नमाज अदा करतो; पत्नीवर लव्ह-जिव्हादचा आरोप
Actors Wife Faced Love Jihad Allegations : जो अभिनेता एकेकाळी महादेवाचा भक्त होता आणि पूजा-आरती यामध्ये विश्वास ठेवायचा, त्याने लग्नासाठी इस्लाम धर्म स्वीकारला. या अभिनेत्याबद्द्ल जाणून घ्या.
Actor Wife Faced Love Jihad Allegations
1/11

छोट्या पडद्यावरील हा प्रसिद्ध अभिनेता आधी महाकालचा कट्टर भक्त होता. मात्र, त्याचे दुसऱ्या लग्नासाठी इस्लाम धर्म स्वीकारला. या अभिनेत्याचं नाव आहे, विवियन डिसेना.
2/11

अभिनेता विवियन डिसेना सध्या बिग बॉस सीझन 18 मध्ये प्रेक्षकांचं मनोरंजन करताना दिसत आहे. विवियन बिग बॉस 18 च्या विजेत्याच्या शर्यतीत पहिल्या क्रमांकावर असल्याचं बोललं जात आहे. दरम्यान, त्याच्याबद्दलच्या काही रंजक गोष्टी जाणून घ्या.
3/11

अभिनेता विवियन डिसेना छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध स्टार्सपैकी एक आहे. त्याची मोठी फॅन फॉलोईंग आहे.
4/11

अभिनेता विवियन डिसेना नेहमीच त्याच्या पर्सनल लाईफमुळे चर्चेत राहिला आहे. त्याच्या पत्नीवर लव्ह जिहादचा आरोपही करण्यात आला होता.
5/11

विवियन डिसेना 'प्यार की ये एक कहानी' मालिकेतून प्रेक्षकांच्या घराघरात पोहोचला. 'मधुबाला' या टीव्ही मालिकेमुळे त्याला खरी प्रसिद्धी मिळाली. त्याशिवाय त्याने 'शक्ती : अस्तित्व के एहसास की' या मालिकेतील दमदार अभिनयामुळेही प्रेक्षकांकडून कौतुकाची थाप मिळवली.
6/11

अभिनेता विवियन डिसेनाच्या धार्मिक आस्थेवर त्याची सहकलाकार अभिनेत्री काम्या पंजाबीने पहिल्यांदाच स्पष्टपणे भाष्य केलं आहे.
7/11

अभिनेत्री काम्या पंजाबी एका रिअॅलिटी शोमध्ये पाहुणी म्हणून आली तेव्हा तिने विवियन डिसेनाच्या धार्मिक श्रद्धेबद्दल काही खुलासे केले. तिने सांगितलं की, विवियन पूर्वी महादेवाचा मोठा भक्त होता. तो धर्मावर खूप विश्वास ठेवत असे, पण त्याने काही वर्षांपूर्वी आपला धर्म बदलला.
8/11

अभिनेत्री काम्या पंजाबीने 'शक्ती' या टीव्ही मालिकेमध्ये अभिनेता विवियन डिसेनासोबत काम केलं होतं. ती त्याला जवळून ओळखते आणि दोघेही खूप चांगले मित्र आहेत. काम्या पंजाबीने सांगितलं की, विवियनने इस्लाम धर्म स्वीकारला आणि आता तो अल्लाहवर विश्वास ठेवतो. तो दिवसातून पाच वेळा नमाज अदा करतो, ही चांगली गोष्ट आहे.
9/11

तिने पुढे सांगितलं की विवियन डिसेना प्रत्येक धर्मावर विश्वास ठेवतो, पण इस्लामवरील त्यांची श्रद्धा अढळ आहे. विवियन बिग बॉसच्या घरातली इस्लाम धर्मातील नियम पाळताना दिसतो, ज्याचं अनेकदा नेटकऱ्यांकडून कौतुकही करण्यात आलं.
10/11

विवियनचे वडील ख्रिश्चन आहेत आणि आई हिंदू आहे. 2019 मध्ये विवियनने इस्लाम धर्म स्वीकारला. त्यानंतर त्याने त्याच्या पहिल्या पत्नीला घटस्फोट दिला आणि 2022 मध्ये नूरनशी लग्न केले. अशी चर्चा होती की अभिनेत्याने त्याची प्रेयसी (आताची पत्नी नूरन) सोबत लग्न करण्यासाठी इस्लाम धर्म स्वीकारला होता.
11/11

दुसऱ्या लग्नानंतर नेटकऱ्यांनी विवियनची पत्नी नूरनला ट्रोल केले आणि त्याच्या धर्म बदलण्याचं कारण ती असल्याचं म्हटलं. पण धर्म बदलण्याचा निर्णय विवियनचा स्वतःचा होता. लोकांनी विवियनच्या पत्नीवर लव्ह जिहादचा आरोप केला.
Published at : 13 Jan 2025 10:57 AM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
























