Ananaya Panday New Photoshoot: बॉलिवूड अभिनेत्री अनन्या पांडे (Ananaya Panday) सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. ती अनेकदा तिच्या फोटोंमुळे चर्चेत येते. पुन्हा एकदा अनन्या पांडेने सोशल मीडियावर पारा वाढवला आहे. अनन्या पांडेने अलीकडेच तिच्या ताज्या फोटोशूटची काही छायाचित्रे सोशल मीडियावर चाहत्यांसोबत शेअर केली आहेत.
2/5
अनन्याने तिचे फोटो तिच्या अधिकृत इन्स्टाग्राम हँडलवर शेअर केले आहेत. ज्यात ती खूप सुंदर दिसत आहे. तुम्हाला अभिनेत्रीच्या या फोटोशूटची चित्रे पुन्हा पुन्हा पाहायला आवडतील. अनन्याने एक प्रिंटेड ड्रेस परिधान केला होता जो तिला चांगला सूट करत होता.
3/5
अनन्याच्या ड्रेसमध्ये प्लंजिंग नेकलाइन तसेच थाय-हाय स्लिट पण आहे, ज्यामुळे ती अधिक मोहक दिसत होती. नशीले डोळे आणि न्यूड मेकअपमुळे अभिनेत्रीचा लूक नेत्रदीपक झालाय.
4/5
अनन्या पांडे व्हिंटेज कारमध्ये कॅमेऱ्यासाठी पोझ देत आहे. कारच्या बाहेर पावसाचे वातावरण निर्माण झाल्याचे फोटोंमध्ये दिसून येते. कारच्या काचेवर पाण्याचे थेंब स्पष्ट दिसत आहेत.
5/5
लवकरच प्रेक्षकांना अनन्या पाडे तिच्या पुढील चित्रपट 'लायगर'मध्ये दिसणार आहे, ज्यामध्ये ती दक्षिण सुपरस्टार विजय देवरकोंडासोबत रोमान्स करताना दिसेल.