एक्स्प्लोर
Aditya Narayan : पहिल्याच चित्रपटच्या सेटवर जुळलं आदित्य-श्वेताचं सूत, 10 वर्षांच्या रिलेशनशीपनंतर बांधली लग्नगाठ!
Aditya_4
1/6

बॉलिवूड अभिनेता-गायक आदित्य नारायण (Aditya Narayan) आणि श्वेता अग्रवाल (Shweta Agarwal) लवकरच आई-वडील होणार आहेत.
2/6

या जोडप्याने आपल्या इंस्टाग्रामवर फोटो शेअर करून चाहत्यांना आनंदाची बातमी दिली आहे. आदित्यने सोशल मीडियावर लिहिले की, ‘श्वेता आणि मी लवकरच तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने आमच्या पहिल्या बाळाचे स्वागत करणार आहोत.’ या फोटोत दोघेही खूप खुश दिसत आहेत.
3/6

आदित्य आणि श्वेता यांनी ‘शपित’ (2010) या चित्रपटात एकत्र काम केले होते. इथूनच दोघांच्या प्रेमकहाणीला सुरुवात झाली होती.
4/6

आदित्य आणि श्वेता यांनी जवळपास 10 वर्षे एकमेकांना डेट केले, त्यानंतर त्यांनी 1 डिसेंबर 2020 रोजी लग्नगाठ बांधली.
5/6

या दोघांनी मुंबईतील इस्कॉन मंदिरात कुटुंबीय आणि काही जवळच्या मित्रांच्या उपस्थितीमध्ये लग्न केले होते.
6/6

कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर लग्नासाठी फक्त 50 लोकांना आमंत्रित करण्यात आले होते. लग्नाच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच 2 डिसेंबरला लग्नाचे रिसेप्शनही आयोजित करण्यात आले होते, ज्यामध्ये दोघांचे कुटुंबीय आणि काही मित्रमंडळी उपस्थित होते.
Published at : 24 Jan 2022 04:08 PM (IST)
आणखी पाहा























