PHOTO : हातात चुडा, गळ्यात महाराणी हार; आलिया भटचा खास नववधू साज
Written By : एबीपी माझा वेब टीम | Updated at : 15 Apr 2022 12:03 PM (IST)
Actress Alia Bhatt Bridal Look
1/9
आलियाचा नववधू साज खूपच सिम्पल पण क्लासी होता. कपाळावर टिकली, डोळ्यांत काजळ आणि चेहऱ्यावर नववधू तेज आलिया खूपच सुंदर दिसत होती.
2/9
आलियानं कोणाचा लेहंगा वेअर केला होता? आलियाच्या लेहंग्याचा रंग कोणता होता? असे प्रश्न सर्वांच्या मनात होते. परंतु, जेव्हा नववधू आलियाचा पहिला फोटो सर्वांसमोर आला, त्यावेळी सर्वांनीच लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला.
3/9
ऑफ व्हाइट आणि गोल्डन कॉम्बिनेशनच्या साडीमध्ये आलिया महाराणीप्रमाणे दिसत होती. ही साडी खासकरुन आलियासाठी डिझाइन करण्यात आली होती.
4/9
प्रसिद्ध डिझायनर सब्यासाचीनं आलियाला वेडिंग लूक डिझाइन केला होता.
5/9
सब्यासाचीनं आपल्या ऑफिशिअल इंस्टाग्राम हँडलवर फोटो शेअर करत आलियाच्या वेडिंग साडीची खासियत सांगितली आहे.
6/9
आलियानं सब्यासाचीच्या उत्तम कलेक्शनमधून आपल्या लग्नासाठी खास या साडीची निवड केली होती.
7/9
हातानं रंगवलेली आयवरी ऑर्गेनान्जा साडीवर नक्षीकाम करण्यात आलं होतं.
8/9
साडीसोबतच आलियानं एक टिश्यू वीलही कॅरी केली होती.
9/9
आलियानं सब्यासाची हॅरिटेज ज्वेलरी ज्यामध्ये अनकट डायमंड आणि मोती असतात, त्याचा नेकलेस कॅरी केला होता. तर गळ्यात हार, कानात झुमके आणि हातातला चुडा सुंदर दिसत होता.