एक्स्प्लोर
Shah Rukh Khan च्या पूर्वीही अनेक कलाकार शुटिंग दरम्यान झाले होते जखमी, जॉन अब्राहमच्या तर गळ्याला लागली होती गोळी
नुकतंच अभिनेता शाहरुख खान सोबत एका सिनेमाच्या शुटिंग दरम्यान अपघात झाला आहे. या अपघातात त्याच्या नाकाला गंभीर दुखापत झाली आहे. यापूर्वीही अनेक बॉलिवूड कलाकर शुटिंगर दरम्यान गंभीर जखमी झाले होते.
Actors Injured
1/6

अमिताभ बच्चन - सिनेमाच्या शुटिंगदरम्यान जखमी होणाऱ्यांमध्ये बॉलिवूडचा अँग्री यंग मॅन अमिताभ बच्चन यांचा पहिला क्रमांक आहे. कुली सिनेमाच्या सेटवर त्याला जबरदस्त मार लागला होता. हा मार इतका भयकंर होता की, अमिताभ अनेक दिवस रुग्णालयात भरती होता. त्यावेळी अमिताभ डॉक्टरांनी केलेल्या चांगल्या उपचारामुळे मृत्यूच्या दाडबेतून बाहेर आला. परंतु, अजूनही ही जखम अमिताभला अधूनमधून त्रास देत असते.
2/6

सैफ अली खान - अभिनेता सैफ अली खान अनेक सिनेमा मारझोड करतानाचे सीन दिले आहेत. त्याचा 2000 साली ‘क्या कहना’ हा सिनेमा पदर्शित झाला होता. या सिनेमाच्या शुटिंगदरम्यान तो डोक एका दगडावर आदळलं होतं. या अपघातामुळे सैफ गंभीर जखमी झाला होता. ही जखम इतकी भयंकर होती की, त्याच्या डोक्यात जवळपास 100 टाके लागले होते.
Published at : 05 Jul 2023 02:26 AM (IST)
आणखी पाहा























