Amruta Khanvilkar : अभिनेत्री अमृता खानविलकर (Amruta Khanvilkar) आणि अभिनेता आदिनाथ कोठारे (Adinath Kothare) यांचा ‘चंद्रमुखी’ हा चित्रपट नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.(photo:jacquelinef143/ig)
2/6
या चित्रपटात अमृता खानविलकर हिने ‘चंद्रा’ची भूमिका साकारली आहे. अभिनेता प्रसाद ओक (Prasad Oak) याने हा चित्रपट दिग्दर्शित केला आहे. नुकतीच अमृता खानविलकरने प्रसाद ओक याच्यासाठी खास पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमधून तिने प्रसादचे आभार मानले आहेत.(photo:jacquelinef143/ig)
3/6
‘चंद्रा सांगते एका.. किती वर्णू ग महिमा त्याचा...या एका वाक्यात सगळं आलं.... @oakprasad कादंबरी देण्यापासून ते हे शेवटचं गाणं करण्यापर्यंत... तू जे जे केलंस त्यासाठी माझ्याकडे शब्द नाहीत..... मला स्वतःशी ओळख करून देण्यासाठी मी आयुष्यभर तुझी ऋणी राहीन....’, असे अमृताने आपल्या पोस्टमध्ये लिहिले आहे.(photo:jacquelinef143/ig)
4/6
अमृता खानविलकरच्या या पोस्टवर प्रसाद ओकने देखील खास कमेंट केली आहे.(photo:jacquelinef143/ig)
5/6
‘गानं ऐकलंय तिचं, नाच पायलाय तिचा, निस्ती चांगली न्हाय... त लैच भारी "कलावंतीन" हाय आमची "चंद्रा". फकस्त नाचातच न्हाय तर अभिनयात बी लैच ताकदीची हाय आमची "चंद्रा", आशीच ऱ्हा "चंद्रा" वानी म्हंजी लोक जवा बी बघत्याल तवा मान ताठ करूनच बघत्याल तुज्याकडं..!!!! लै लै लै म्हंजी लैच पिरेम’, असं म्हणत प्रसादने देखील अमृताचं ‘चंद्रा’ भूमिकेसाठी कौतुक केलं आहे.(photo:jacquelinef143/ig)
6/6
'चंद्रमुखी' हा चित्रपट लेखक विश्वास पाटील यांच्या ‘चंद्रमुखी’ या कांदबरीवर आधारित आहे. अक्षय बर्दापूरकर, प्लॅनेट मराठी आणि गोल्डन रेशो फिल्म्स निर्मित, क्रिएटिव्ह वाईब प्रॉडक्शन्स प्रस्तुत, फ्लाइंग ड्रॅगन एंटरटेनमेंट, लाइटविदिन एंटरटेनमेंट सहप्रस्तुत या चित्रपटाची पटकथा, संवाद चिन्मय मांडलेकर यांचे असून अजय - अतुल या दमदार जोडीने 'चंद्रमुखी'ला संगीत दिले आहे.(photo:jacquelinef143/ig)