मराठी अभिनेत्री अभिज्ञा भावे(Abhidnya Bhave) सोशल मीडियावर वेगवेगळ्या पोस्ट शेअर करत असते. अभिज्ञाचा पती मेहुल पै (Mehul Pai) सध्या कॅन्सरशी झुंज देत आहे.(photo:abhidnya.u.b/ig)
2/6
नुकताच अभिज्ञानं मेहुलसोबतचा एक खास व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये अभिज्ञा मेहुलसोबत एक गेम खेळताना दिसत आहे.(photo:abhidnya.u.b/ig)
3/6
अभिज्ञानं मेहुलसोबतचा खास व्हिडीओ शेअर करून कॅप्शनमध्ये लिहिले, 'थेरपीच्या काळात आम्ही अशा प्रकारे वेळ घालवतो.' तिनं शेअर केलेल्या व्हिडीओला कमेंट करून नेटकऱ्यांनी त्यांचे कौतुक केलं आहे.(photo:abhidnya.u.b/ig)
4/6
अभिनेता सुयश टिळकनं या व्हिडीओला 'More power', अशी कमेंट केली. तर अभिनेत्री मयुरी देशमुख, सुखदा खांडकेकर, तेजस्विनी पंडित यांनी देखील अभिज्ञानं शेअर केलेल्या व्हिडीओला कमेंट्स केल्या आहेत.(photo:abhidnya.u.b/ig)
5/6
6 जानेवारी 2021 रोजी अभिज्ञा आणि मेहुल यांनी लग्नगाठ बांधली. लग्नाआधी 15 वर्ष हे दोघे एकमेकांना ओळखत होते. कॉलेजनंतर त्यांचा संपर्क तुटला होता.(photo:abhidnya.u.b/ig)
6/6
हे दोघे पुन्हा एकमेकांच्या संपर्कात आले. त्यांच्या मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले. त्यानंतर अभिज्ञा आणि मेहुल यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. अभिज्ञा मेहुलसोबतचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर नेहमी शेअर करते.(photo:abhidnya.u.b/ig)