एक्स्प्लोर
Pune Bypoll Elections: पुण्यात गुलाल कुणाचा? कसबा, चिंचवडमध्ये मतमोजणीला सुरुवात
कसबा-चिंचवड पोटनिवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात... पोस्टल मतमोजणीत चिंचवडच्या अश्विनी जगताप आघाडीवरकसबा आणि चिंचवडमध्ये कोण बाजी मारणार?... महाविकास आघाडी विरुद्ध भाजप-शिंदे गटात चुरशीची लढत
Maharashtra Pune Bypoll Elections 2023
1/8

पुण्यातील कसबा पेठ आणि चिंचवड पोटनिवडणुकीचा आज निकाल लागणार आहे. मतमोजणीला सुरुवात झाली आहे.
2/8

कसब्यात भाजपच्या हेमंत रासने विरुद्ध कॉंग्रेसचे रविंद्र धंगेकर अशी थेट लढत आहे. तर चिंचवडमध्ये भाजपच्या अश्विनी जगताप, राष्ट्रवादीचे नाना काटे तर अपक्ष उमेदवार राहुल कलाटे अशी तिरंगी लढत आहे.
3/8

पुणे पोटनिवडणुकीच्या निमित्तानं दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.
4/8

भाजप उमेदवाराच्या प्रचारासाठी केंद्रीय मंत्र्यांपासून ते राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री प्रचारात उतरले होते. तर, दुसरीकडे महाविकास आघाडीच्या अनेक दिग्गज नेत्यांनी प्रचारात सहभाग घेतला होता.
5/8

मतमोजणीच्या पहिल्या कलापासूनच कसब्यात काँग्रेस उमेदवार रवींद्र धंगेकर आणि चिंचवडमधून भाजप उमेदवार अश्विनी जगताप आघाडीवर आहेत.
6/8

चिंचवड आणि कसब्यात मतमोजणीसाठी मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे.
7/8

निवडणूर निकालांत गुलाल कोणाचा उधळणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
8/8

कसबा आणि चिंचवडमध्ये दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली असून आज मतपेट्यांमधून कोण बाजी मारणार याकडे राज्याचं लक्ष लागलं आहे.
Published at : 02 Mar 2023 09:21 AM (IST)
आणखी पाहा























