एक्स्प्लोर
Lok Sabha Election Results 2024 : एकनाथ शिंदेंच्या विजयी उमेदवारांची यादी, पाहा
Lok Sabha Election Results 2024 : लोकसभा निवडणुकीचा निकाल समोर आला आहे. यामध्ये एकनाथ शिंदेंच्या विजयी उमेदवारांची यादी देण्यात आली आहे.

Lok Sabha Election Results 2024
1/7

छत्रपती संभाजीनगरात एकनाथ शिंदे पक्षाचे नेते संदीपान भुमरे यांचा विजय झाला आहे. एमआयएम पक्षाचे नेते तथा विद्यमान खासदार इम्तियाज जलील तसेच उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे नेते चंद्रकांत खैरे यांचा त्यांनी पराभव केला आहे.
2/7

मावळमध्ये शिवसेना शिंदे गटाच्या श्रीरंग बारणेंचा विजय झाला आहे, तर ठाकरे गटाच्या संजोग वाघेरे यांचा पराभव झाला आहे.
3/7

कल्याण लोकसभा मतदारसंघात श्रीकांत शिंदे सलग तिसऱ्यांदा विजयाच्या उंबरठ्यावर आहेत. त्यांनी ठाकरे गटातील वैशाली दरेकर यांचा पराभव केला आहे.
4/7

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाणेनगरीत शिवसेनेच्या शिंदे गटाचे नरेश म्हस्के आणि शिवसेनेच्या ठाकरे गटाचे राजन विचारे यांच्यात लोकसभा निवडणुकीदरम्यान दुहेरी लढत पाहायला मिळाली. यामध्ये नरेश म्हस्के यांचा विजय झाला आहे.
5/7

बुलढाणा मतदारसंघात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने बुलढाण्याचा गड राखला आहे. बुलढाण्यात प्रतापराव जाधव यांनी शिवसेना-ठाकरे गटाचे उमेदवार नरेंद्र खेडेकर यांचा पराभव केला आहे.
6/7

हातकणंगले मतदारसंघात शिवसेना शिंदे गटाचे धैर्यशील माने विजयी झाले, त्यांनी ठाकरे गटाच्या सत्यजीत पाटील यांचा पराभव केला.
7/7

उत्तर पश्चिम मतदारसंघात एकनाथ शिंदे गटाचे उमेदवार रविंद्र वायकर यांचा विजय झाला आहे. ठाकरे गटाचे नेते अमोल कीर्तिकर यांचा त्यांनी पराभव केला आहे.
Published at : 04 Jun 2024 08:04 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
राजकारण
करमणूक
भारत
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
