एक्स्प्लोर
एकापेक्षा अधिक डी-मॅट खाते असतील तर सावधान! अन्यथा होऊ शकते 'हे' नुकसान
दोन डी-मॅट खाते असल्यावर खर्च वाढतो. हा खर्च वाढू नये म्हणून फक्त एकच डी मॅट खाते वापरणे सोईचे ठरते. दोन डी-मॅट खाते वापरल्यावर काय होते, ते जाणून घेऊ या....
![दोन डी-मॅट खाते असल्यावर खर्च वाढतो. हा खर्च वाढू नये म्हणून फक्त एकच डी मॅट खाते वापरणे सोईचे ठरते. दोन डी-मॅट खाते वापरल्यावर काय होते, ते जाणून घेऊ या....](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/05/08/33651d9ca0e5e91a7fb8ae3faf7431a81715165722100988_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
d mat account (फोटो सौजन्य- एबीपी नेटवर्क)
1/7
![शेअर बाजार, म्यूच्यूअल फंडात गुंतवणूक करण्यासाठी डी-मॅट अकाऊंटची गरज असते. या खात्याशिवाय तुम्हाला गुंतवणूक करता येत नाही. सध्या अनेक ब्रोकरेज फर्म, बँका डी-मॅट खाते खोलण्यासाठी ग्राहकांना वेगवेगळ्या ऑफर्स देत आहेत. मात्र एकापेक्षा अधिक डी-मॅट खाते असणे डोकेदुखी ठरू शकतं.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/05/08/ce0a45d56bd24f58f37d62b6d9eeb18bb230b.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
शेअर बाजार, म्यूच्यूअल फंडात गुंतवणूक करण्यासाठी डी-मॅट अकाऊंटची गरज असते. या खात्याशिवाय तुम्हाला गुंतवणूक करता येत नाही. सध्या अनेक ब्रोकरेज फर्म, बँका डी-मॅट खाते खोलण्यासाठी ग्राहकांना वेगवेगळ्या ऑफर्स देत आहेत. मात्र एकापेक्षा अधिक डी-मॅट खाते असणे डोकेदुखी ठरू शकतं.
2/7
![गेल्या काही वर्षांपासून शेअर बाजारात गुंतवणूक करणाऱ्यांची संख्या लक्षणीयरित्या वाढली आहे. त्याची प्रमुख दोन कारणं आहेत. यातील पहिलं कारण म्हणजे, करोना महासाथीनंतर शेअर बाजार, म्यूच्यूअल फंडात गुंतवणूक करणाऱ्यांची संख्या चांगलीच वाढली आहे. आता पैसे एफडी करण्यापेक्षा लोक तेच पैसे शेअर बाजारात गुतवणे सोईचे समजत आहेत.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/05/08/7b1d744a0d4ce599652c885218cf56c2cfc93.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
गेल्या काही वर्षांपासून शेअर बाजारात गुंतवणूक करणाऱ्यांची संख्या लक्षणीयरित्या वाढली आहे. त्याची प्रमुख दोन कारणं आहेत. यातील पहिलं कारण म्हणजे, करोना महासाथीनंतर शेअर बाजार, म्यूच्यूअल फंडात गुंतवणूक करणाऱ्यांची संख्या चांगलीच वाढली आहे. आता पैसे एफडी करण्यापेक्षा लोक तेच पैसे शेअर बाजारात गुतवणे सोईचे समजत आहेत.
3/7
![दुसरं कारण म्हणजे डी-मॅट खाते चालू करणे आता तुलनेने फार सोपे झाले आहे. अगोदर ही प्रक्रिया फार किचकट होती. सध्या सगळीकडे डिजीटलायझेशन झाल्यामुळे घरबसल्या तुम्हाला डी-मॅट अकाऊंट चालू करता येते. डी-मॅट खात्यांचे प्रमाण वाढण्याचे हे दुसरे प्रमुख कारण आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/05/08/f244d767c37a93c2d39600fbe94b1ddf24367.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
दुसरं कारण म्हणजे डी-मॅट खाते चालू करणे आता तुलनेने फार सोपे झाले आहे. अगोदर ही प्रक्रिया फार किचकट होती. सध्या सगळीकडे डिजीटलायझेशन झाल्यामुळे घरबसल्या तुम्हाला डी-मॅट अकाऊंट चालू करता येते. डी-मॅट खात्यांचे प्रमाण वाढण्याचे हे दुसरे प्रमुख कारण आहे.
4/7
![पण एकापेक्षा अधिक डी-मॅट अकाऊंट असणे हे डोकेदुखीचे कारण ठऱू शकते. कारण डी-मॅट खाते खोलण्यासाठी बँका वेगवेगळ्या ऑफर्स देतात. ज्यामुळे गुंतवणूकदार आकर्षित होतात आणि एकापेक्षा अधिक डी-मॅट खाते खोलतात. परिणामी एकापेक्षा अधिक डी-मॅट खाते असल्यावर खर्च वाढतो.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/05/08/4715599d24466bea8f27aa3561eeb8f9cf674.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
पण एकापेक्षा अधिक डी-मॅट अकाऊंट असणे हे डोकेदुखीचे कारण ठऱू शकते. कारण डी-मॅट खाते खोलण्यासाठी बँका वेगवेगळ्या ऑफर्स देतात. ज्यामुळे गुंतवणूकदार आकर्षित होतात आणि एकापेक्षा अधिक डी-मॅट खाते खोलतात. परिणामी एकापेक्षा अधिक डी-मॅट खाते असल्यावर खर्च वाढतो.
5/7
![डी-मॅट खात्यावर दरवर्षी एक निश्चित फी द्यावी लागते. तुम्ही एखादे डी-मॅट खाते वापरत नसले तरीदेखील वर्षाला ही फी द्यावीच लागते. म्हणजेच एकापेक्षा अधिक खाते असल्यावर खिशाला कात्री लागते.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/05/08/3869702421e1ddc7788571652b9c5c0183ea1.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
डी-मॅट खात्यावर दरवर्षी एक निश्चित फी द्यावी लागते. तुम्ही एखादे डी-मॅट खाते वापरत नसले तरीदेखील वर्षाला ही फी द्यावीच लागते. म्हणजेच एकापेक्षा अधिक खाते असल्यावर खिशाला कात्री लागते.
6/7
![डी-मॅट खाते चालू करणे सोपे आहे. मात्र ते बंद करणे अवघड आहे. डी-मॅट खाते ऑनलाईन बंद करता येत नाही. त्यासाठी डिपॉझिटरी पार्टिसिपेंट ऑफसला जावे लागते. तिथे जाऊन डी-मॅट अकाऊंट क्लोजिंग फॉर्म भरावा लागतो. फॉर्म भरल्यानंतर पुढच्या दहा दिवसांच्या आत हे खाते बंद केले जाते.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/05/08/1d3b5361d256a970a14c64cca39962b177e63.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
डी-मॅट खाते चालू करणे सोपे आहे. मात्र ते बंद करणे अवघड आहे. डी-मॅट खाते ऑनलाईन बंद करता येत नाही. त्यासाठी डिपॉझिटरी पार्टिसिपेंट ऑफसला जावे लागते. तिथे जाऊन डी-मॅट अकाऊंट क्लोजिंग फॉर्म भरावा लागतो. फॉर्म भरल्यानंतर पुढच्या दहा दिवसांच्या आत हे खाते बंद केले जाते.
7/7
![image 7](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/05/08/98b2cb4cdbb2fcd912bf21aff65e59e8b1405.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
image 7
Published at : 08 May 2024 04:26 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
बीड
भारत
राजकारण
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)