एक्स्प्लोर
Khedkar Case: मनोरमा खेडकर प्रकरणात 31 ऑक्टोबरपर्यंत अंतरिम जामिनाची मुदतवाढ
नवी मुंबईतील ऐरोली येथील अपघात आणि अपहरण प्रकरणी वादग्रस्त माजी आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांची आई मनोरमा खेडकर यांच्यावर आज बेलापूर न्यायालयात सुनावणी झाली. न्यायालयाने मनोरमा खेडकर यांना ३१ ऑक्टोबरपर्यंत अंतरिम जामीन वाढवून दिला आहे. यापूर्वी न्यायालयाने त्यांना १३ ऑक्टोबरपर्यंत अंतरिम जामीन मंजूर केला होता. ऐरोली-मुलुंड मार्गावर झालेल्या एका रस्ते अपघातानंतर ट्रक चालकाच्या अपहरण आणि पुरावे नष्ट केल्याचा आरोप मनोरमा खेडकर यांच्यावर आहे. या प्रकरणात त्यांचे पती दिलीप खेडकर हे मुख्य आरोपी असून ते अद्याप फरार आहेत. पोलिसांनी यापूर्वीच खेडकर दाम्पत्याविरोधात लुकआऊट नोटीसही जारी केली आहे.
आणखी पाहा
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
सोलापूर
क्राईम
महाराष्ट्र
राजकारण
Advertisement
Advertisement

















